शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री देसाईंनी 'पाटणकरां'बाबतची भूमिका स्पष्ट करावी, म्हणजे जनतेचे प्रबोधन होईल; हर्षद कदमांनी लगावला टोला

By प्रमोद सुकरे | Updated: June 11, 2025 18:26 IST

'भूकंपाची आम्हाला सवय' 

प्रमोद सुकरे कऱ्हाड: महाविकास आघाडीच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला आहे. महायुतीतील शिंदे सेनेचे मंत्री व पाटणचे आमदार शंभूराज देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मैत्रीचे संबंध पाहता देसाई यांना विचारूनच हा पक्षप्रवेश झाला असावा. त्यामुळे आता मंत्री देसाईंनी पाटणकरांच्या बाबतची आपली नेमकी काय भूमिका आहे ती एकदा स्पष्ट करावी म्हणजे मतदार संघातील जनतेचे प्रबोधन होईल असे टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.कदम म्हणाले, पाटण तालुक्यातील जनता ही वैचारिक पातळीवर काम करणारी आहे. त्यामुळे कोणी पक्ष बदलले म्हणून सगळ्याच लोकांना ते विचार पटलेले आहेत असे म्हणता येणार नाही. नजीकच्या काळामध्ये कार्यकर्त्याला भेटून, आमच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना संघटित करून पुढील दिशा ठरवणार आहे.आज जो तो चालत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या डोक्यात काय आहे? याबाबत छेडले असता, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. लढाई आमच्या रक्तात आहे. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात, जिल्ह्यात 'मशाल' घेऊन आमची लढाई यापुढेही कायम राहील असेही एका प्रश्नावर कदम म्हणाले. भूकंपाची आम्हाला सवय पाटण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा राजकीय भूकंप मानला जातो. याबाबत विचारले असता, आम्ही कोयना धरणाच्या जवळ रहातो. भूकंपांची आम्हाला सवय आहे.त्यातून पुन्हा उभारी कशी घ्यायची हे आम्हाला चांगले माहीत आहे.असेही एका प्रश्नावर बोलताना कदम यांनी सांगितले.ते आता जनतेने ठरवायचं आता मंत्री देसाई व त्यांचे विरोधक सत्यजित पाटणकर एकत्रित आले आहेत. उद्या ते मांडीला मांडी लावून बसलेले दिसतील. मग जनतेने काय करायचे? याबाबत छेडले असता ते आता जनतेने ठरवायचे आहे. पण मतदार संघात आम्ही सक्षम विरोधक म्हणून यापुढेही कार्यरत राहणार आहोत असेही कदम एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.