शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजच्या बांधकामाचे १२५ कोटींचे बिल थकीत, मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले..

By दीपक देशमुख | Updated: December 30, 2023 17:18 IST

सातारा : सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेज बांधकामाचा सुमारे १२५ कोटींचे बिल थकीत आहे. हिवाळी अधिवेशनात ५५ हजार कोटी ...

सातारा : सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेज बांधकामाचा सुमारे १२५ कोटींचे बिल थकीत आहे. हिवाळी अधिवेशनात ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही महिनाभरात होईल. त्यानंतर प्रलंबीत बिलांचा विषय राहणार नाही, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे कराड उत्तर मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, उपाध्यक्ष धनंजय जांभळे, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांना शैक्षणिक कार्यक्रमा आलो असल्याचे सांगत त्यांनी बगल दिली. महायुतीतील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतील, असे ठरलेले उत्तर दिले. सातारा लोकसभेला उमेदवार कोण याबाबत त्यांनी हे मोठे प्रश्न असून या प्रश्नांची उत्तरे देण्यास मी असमर्थ असल्याचे मिश्किलपणे सांगत आटोपते घेतले.  यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एकेकाळी निष्ठावंत सहकारी असलेले पण सध्या अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्या माजी आनंदराव पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारण