शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत.., फलटण परिसरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:08 IST

दुधाचा दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गत तीन महिन्यांपूर्वी मिळणारा प्रतिलिटर ३३ रुपये ५० पैसे हा दर आता २२ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्दे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत.., फलटण परिसरातील चित्र ३३ रुपये ५० पैसे हा दर आता २२ रुपये प्रतिलिटर

वाठार निंबाळकर : दुधाचा दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गत तीन महिन्यांपूर्वी मिळणारा प्रतिलिटर ३३ रुपये ५० पैसे हा दर आता २२ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.फलटण तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून दुग्धव्यवसाय सुरू केलेला आहे. सर्व काही सुरळीतपणे सुरू होते. गत तीन महिन्यांपासून अचानक दुधाचे दर कमी झाल्याने पशुखाद्य चारा व औषधोपचार याचा खर्चही पदरमोड करून करावा लागत आहे. आज फलटण तालुक्यात गायी व म्हैस अशी जवळपास ९२,००० इतकी जनावरांची संख्या असून, हजारो तरुण दूध व्यवसाय करीत आहेत.कडवळ व मका या चाऱ्याचा दर प्रतिअडीच गुंठे साडेतीन ते चार हजार रुपये इतका असून, पशुखाद्य १४०० ते १७०० रुपये प्रति ५९ किलो इतका आहे. भुस्सा १२०० रुपये ते १४०० रुपये प्रति ४९ किलोसाठी असा दर आहे. अशा परिस्थितीत एका गायीसाठी प्रतिदिन कमीत कमी २५ किलो चारा, त्यासाठी कडवळ अथवा मका याचा खर्च १४५ ते १५० रुपये, पशुखाद्य कमीत कमी ५ किलो, त्यासाठी ११८ ते १३५ रुपये इतका तर भुस्सा ५ किलो त्यासाठी १२२ ते १४२ रुपये इतका, टॉनिक व इतर औषधे यासाठी ५० रुपये इतका असा प्रतिदिन एका गायीसाठी ४३५ रुपये ते ४७७ रुपये इतका खर्च येत आहे.एक गाय दिवसाला सरासरी १६ ते १८ लिटर दूध देते, त्याचे सध्याच्या २२ रुपये दराप्रमाणे ३५२ ते ३९६ रुपये इतके उत्पादन मिळते. गाय आजारी पडली तर अचानकपणे येणाऱ्या आजारासाठी तीन ते चार हजार रुपये आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी शासनाने पूर्वीप्रमाणे ३५ ते ३८ रुपये प्रतिलिटर दूध दर द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

उन्हाळ्यात चारा उपलब्ध नाही, बागायत परिसरातून साडेतीन ते चार हजार रुपये प्रति अडीच गुंठ्यासाठी द्यावे लागत असून, वाहतुकीसाठी वेगळा खर्च होतो आहे. त्यात दुधाचा दर वाढण्याऐवजी कमी झाल्याने पदरमोड करून जनावरे जगवावी लागत आहेत.-नामदेव काळे, शेतकरी, मिरढे, ता. फलटण

नोकरीअभावी बँकेचे कर्ज काढून व्यवसाय केला. मात्र, सध्या दर कमी झाल्याने रोजचा तोटा सहन करावा लागत आहे. तातडीने दरवाढ न केल्यास आत्मदहन करणार आहे.-दादासाहेब निंबाळकर, शेतकरी, तावडी 

टॅग्स :milkदूधSatara areaसातारा परिसर