शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

गोळीबार करून पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/वडगाव हवेली : सशस्त्र दरोडेखोरांनी गोळीबार करीत पेट्रोलपंपावर दरोडा टाकला. कर्मचाºयांना मारहाण करून त्यांनी २५ हजारांची रोकडही लुटली. त्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांना पोलिसांनी थरारक पाठलाग करून कºहाडात पकडले. वडगाव हवेली, ता. कºहाड येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरोड्याची घटना घडली.अक्षय भारत कावरे (रा. अपशिंगे, ता. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/वडगाव हवेली : सशस्त्र दरोडेखोरांनी गोळीबार करीत पेट्रोलपंपावर दरोडा टाकला. कर्मचाºयांना मारहाण करून त्यांनी २५ हजारांची रोकडही लुटली. त्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांना पोलिसांनी थरारक पाठलाग करून कºहाडात पकडले. वडगाव हवेली, ता. कºहाड येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरोड्याची घटना घडली.अक्षय भारत कावरे (रा. अपशिंगे, ता. कडेगाव, जि. सांगली), अनमोल जीवनसिंग शर्मा (रा. हसी, जि. हिसार, हरियाणा), दीपक रामराज गर्ग (रा. पैकरहेडी, ता. जिंद, हरियाणा), ईश्वरसैनी राजकुमारसैनी (रा. पिहोवा, जि. कुरुक्षेत्र, हरियाणा) व महेंद्र सूर्यग्यान गुजर (रा. बाबूधाम, चाणक्यपुरी, नवी दिल्ली) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या पाचजणांबरोबर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाड-तासगाव मार्गावर वडगाव हवेली हद्दीत दीपक जोशी यांचा पेट्रोलपंप आहे. दीपक जोशी यांच्यासह कर्मचारी मल्लिकार्जुन बिराजदार, तुषार सागरे व परमेश्वर शेळके शुक्रवारी रात्री पंपावर होते. हे चौघे रात्री साडेअकराच्या सुमारास पंपाच्या आॅफिसजवळ कट्ट्यावर गप्पा मारत बसले असताना दोन दुचाकीवरून पाचजण त्याठिकाणी आले. एकाने दुचाकीवरून खाली उडी मारून कर्मचाºयांच्या दिशेने पिस्तूल रोखली. गोळीबार करीत त्याने कर्मचाºयांवर दहशत निर्माण केली. अन्य तिघेजण हातात तलवार व चाकू घेऊन कर्मचाºयांजवळ आले. त्यांनी कर्मचाºयांना तेथून उठवून पंपाच्या कार्यालयात नेले. त्याठिकाणी दीपक जोशी यांच्यासह कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली. तसेच २२ हजार ३१५ रुपयांची रोकड व १२ हजार रुपये किमतीचे मोबाईल घेऊन दरोडेखोर दुचाकीवरून तासगावच्या दिशेने पसार झाले. घटनेनंतर दीपक जोशी यांनी तातडीने स्वत:च्या कारमधून दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. ते शेणोली गावापर्यंत पोहोचले. तेथून दरोडेखोर सोनसळ घाटमार्गे नेर्लेकडे गेल्याचे जोशी यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरून फोन करून याबाबतची माहिती कºहाड पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस ठाण्यातून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे सातारा व सांगली जिल्ह्यांतील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रात्रगस्तीवर असणाºया पोलीस वाहनांना संबंधित दुचाकींचा पाठलाग करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, वडगाव हवेलीतून तासगाव रस्त्याने पोबारा केलेले दरोडेखोर शेणोली स्टेशनमधून सोनसळ घाटमार्गे कºहाड-विटा रोडवर पोहोचले. तेथून ते सुर्ली घाटातून परत कºहाड शहराच्या दिशेने आले. ओगलेवाडी येथे रात्रगस्तीसाठी असणारे सहायक फौजदार दीपक साळुंखे व हवालदार किरण बामणे यांनी दुचाकीच्या क्रमांकावरून दरोडेखोरांना ओळखले. मात्र, ते दुचाकी अडविण्याच्या प्रयत्नात असतानाच दरोडेखोर तेथून सुसाट पुढे आले. कृष्णा कॅनॉलवर हवालदार गणेश देशमुख व मोहित गुरव नाकाबंदीसाठी होते. त्यांनी धाडसाने दरोडेखोरांच्या दुचाकी अडविल्या. ते संशयितांकडे चौकशी करीत असतानाच पोलीस जीप त्याठिकाणी पोहोचली. पोलिसांनी दुचाकीवरील पाचजणांना ताब्यात घेतले. तसेच दुचाकीची झडती घेण्यात आली. त्यावेळी वडगाव हवेलीतील पंपातून लुटलेली रोकड व मोबाईल आढळून आले.संशयितांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी वडगाव हवेलीतील दरोड्याच्या गुन्ह्यासह काही दिवसांपूर्वी कडेगाव येथील पेट्रोलपंपावर टाकलेल्या दरोड्याची कबुली दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच या टोळीतील अन्य एकजण शहरातील कोयना लॉजमध्ये लपून बसला होता. पोलिसांनी त्या लॉजवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. याबाबतची नोंद कºहाड तालुका पोलिसांत झाली आहे. पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.