शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
4
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
5
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
6
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
7
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
8
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
9
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
10
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
11
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
12
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
13
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
14
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
15
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
16
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
17
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
18
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
19
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
20
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा

‘मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन’ थोतांड

By admin | Updated: January 7, 2015 23:54 IST

‘अंनिस’चा दावा : साताऱ्यातील पत्रकार परिषदेत भांडाफोड केल्याचीही माहिती

सातारा : ‘मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन हे विज्ञानाच्या नावावर चालणारे थोतांड आहे. याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भांडाफोड केली आहे,’ असा दावा ‘अंनिस’चे डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी केला आहे.येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ‘अंनिस’चे भगवान रणदिवे, उदय चव्हाण आदी उपस्थित होते. डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांत सातारा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुलांचे मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन करून त्यांचा बुध्यांक तसेच स्मरणशक्ती वाढवितो, असे दावे करणाऱ्या मार्गदर्शन वर्गाचे पेव फुटले आहे. मिड ब्रेन (मध्य मेंदू)चे उद्दिपन केल्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधूनही मुलांना केवळ स्पर्शाने अथवा वासाने गोष्टी ओळखता येतात, असा दावा मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनच्या जाहिरातींमधून केला जातो. विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुलांची व पालकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. ‘अंनिस’ने या हातचलाखीचा भांडाफोड केला असल्याने पालकांनी या प्रकारापासून सावध राहावे. डोळ्यावर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांच्या मध्यभागी जी जागा राहते. त्यामधून बघून गोष्टी ओळखल्या जातात. जर हाताने दाब देऊन डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यावर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर या गोष्टी ओळखता येत नाहीत, हे प्रशांत पोतदार यांनी सप्रयोग करून दाखविले. आजूबाजूला अंधार करून किंवा मागच्या बाजूला वस्तू धरली असता मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत. तसेच अंध मुलांनाही मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनचे कितीही प्रशिक्षण दिले तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाहीत,’ हे त्यांनी सांगितले.मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनच्या नावाखाली चालणारी फसवणूक तातडीने बंद व्हावी म्हणून ‘अंनिस’ने राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. साताऱ्यातील प्रकार थांबविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिले आहे. अशा बाबतीत फसवणूक झालेल्या पालकांनी ‘अंनिस’शी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. (प्रतिनिधी) भांडाफोडची चित्रफीत...नाशिक येथील ओझर शाखेच्या ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी जाहीर कार्यक्रमात मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनच्या दाव्याचा भांडाफोड केल्याची चित्रफीत पत्रकार परिषदेत दाखविण्यात आली. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून कशा प्रकारे हातचलाखीने वस्तू ओळखता येतात, याचे ही प्रात्यक्षिक प्र्रशांत पोतदार यांनी दाखविले.