शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

म्हसवडला कोरोना बाधितांची संख्या कमी तर मृत्यूदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:15 IST

number of corona cases, death rate increased, news in satara म्हसवड व परिसरात गेल्या तीन-चार दिवसांत कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असल्याने म्हसवडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देम्हसवडला कोरोना बाधितांची संख्या कमी तर मृत्यूदर वाढला पाच दिवसांत आठ बळी : नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

म्हसवड : म्हसवड व परिसरात गेल्या तीन-चार दिवसांत कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असल्याने म्हसवडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.म्हसवड शहरात सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत कोरोनाने अक्षरश: हाहाकार उडवून दिला होता. शहरात दररोज २५ ते ३० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी ती वाढत गेल्याने आरोग्य विभागाबरोबर प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती.

कोरोनाला रोखण्याठी म्हसवड ग्रामस्थ, नगरसेवक व प्रशासनाने शहरात १४ दिवसांचा लॉकडाऊन पाळला. या कालावधीतही काही व्यापाऱ्यांने सर्वच नियमांना फाटा देत ह्यमी किती हुशार आहे. माझे दुकान उघडल्याशिवाय माझे कुटुंब चालत नाहीह्ण या अविर्भावात दुकाने उघडी ठेवून कोरोनाचा संसर्ग वाढवण्याचे काम केले.कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. या प्रयत्नांना यशही येत आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांत म्हसवडमधील बाधितांची संख्या कमी झाली आहे. मात्र, आठ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेच वाढ झाली आहे. बाधितांबरोबरच मृत्यूदर रोखण्याचे मोठे आव्हान आता आरोग्य यंत्रणेपुढे आहे.प्रभावी उपायोजनांची गरजबंद काळात दुकाने उघडी ठेवल्याने बाधितांची संख्या वाढती गेली. या दुकानदारांवर व व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास म्हसवड पोेलीस व प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. बसस्थानक चौकात आठ ते दहा पोलीस कर्मचारी तैनात असूनही बाहेरून येणाऱ्या अथवा इतर कोणत्याच वाहनांची चौकशी करण्यात आली नाही.

पालिका प्रशासनाने देखील बंद काळात मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी दंडाचे पावती पुस्तक पोलीस ठाण्याचे रस्ते वाहतूक शाखेकडे देऊन आपल्या खंद्यावरील ओझे कमी केले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतचे बाब बनली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर