शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पारा खालावला; जिल्हा गारठला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:20 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, गेल्या दोन दिवसांपासून तर किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, गेल्या दोन दिवसांपासून तर किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले आहे. तर सततच्या गारठ्यामुळे थंडीने मुक्काम केल्याची भावना लोकांची झाली आहे. दरम्यान, या थंडीमुळे शहराच्या ठिकाणच्या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.गेल्यावर्षीपेक्षा यंदा थंडीला लवकर सुरुवात झाली. दिवाळीच्या सणापासून थंडीला प्रारंभ झाला होता. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ होऊन १५ नोव्हेंबरच्या सुमारास यावर्षी प्रथमच किमान तापमान १३.४ अंशापर्यंत खाली आले होते. तर दि. १ डिसेंबरला किमान तापमान १२.३ अंशावर होते तर त्यानंतर ५ ते ९ डिसेंबरपर्यंत किमान तापमान अचानक वाढले. यामुळे थंडी गायब झाली होती. ८ आणि ९ डिसेंबरला तर १६.९ अंश तापमान नोंदले होते. मात्र, १० डिसेंबरला एका दिवसात दीड अंशाने तापमान कमी झाले तर ११ डिसेंबरला एकदम ६ अंशाने तापमान कमी होऊन ९.५ अंश नोंदले गेले. यामुळे एकदमच थंडीची लाट निर्माण झाली.आता तर यावर्षींचे आतापर्यंतचे सर्वात कमी म्हणजे ९ अंशापर्यंत किमान तापमान खाली आहे. यामुळे हुडहुडी भरून येत आहे. शनिवारी तर किमान तापमान ९.१ अंशावर होते. तर रविवारी ९.४ होते. पण, सतत तापमान १० अंशाच्या आसपास राहिल्याने गारठा वाढला आहे. यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. शेतकरी दुपारच्या वेळी शेतातील कामे करतात. तसेच मोठ्या शहरातील बाजारपेठेवर याचा परिणाम दिसत आहे. रात्री आठनंतर बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून येत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. ऊबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.