शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पारा 40 अंशांच्या वर.. धरणं 30 टक्क्यांच्या आत !

By admin | Updated: April 9, 2016 00:15 IST

पाणी साठा झपाट्यानं खाली : कसा जाणार उन्हाळा, हा एकच सवाल !

सागर गुजर -- सातारा --जिल्ह्यातल्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य अजूनही आग ओकत आहे. उन्हाचा पारा ४० अंशाच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धरणांत उरलेले पाणीही आटण्याच्या मार्गावर आहे. धरणाचा पाणीसाठा ३० टक्क्यांहून कमी झाला आहे. जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी, येरळवाडी या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. कण्हेर धरणातून उन्हाळीचे एक आवर्तन सध्या सुरू आहे. धोम धरणातील पाणीही आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उरमोडी धरण वगळता इतर धरणांतील पाणी अत्यल्प उरले आहे. येरळवाडी धरणातील पाणी संपले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे. धरणांतून नद्यांत पाणी सुटले तरच नदीकाठच्या पाणी योजना सुस्थितीत चालू राहणार आहेत. मात्र, धरणांतील आवर्तने कमी झाल्याने पाणी योजनाही धोक्यात आल्या आहेत. अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. काही गावांतील पाणी योजना बंद कराव्या लागल्या आहेत. तर बहुतांश गावांमध्ये एक दिवसाआड दिवस पिण्याचे पाणी सोडायला सुरुवात केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळी भागाबरोबरच पश्चिमेकडील पाऊसमान चांगले असलेल्या प्रदेशातील लोकांनाही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एप्रिल, मे महिन्यांत तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली तरी जुलै, आगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजडावा लागणार आहे. बागायत क्षेत्र घटलेजिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात बागायती पिके घेतली जातात. उन्हाळ्यामुळे विहिरींतील पाणीसाठाही कमी झाला असल्याने बहुतांश ठिकाणी बागायत क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काकडी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशा पिकांचे प्रमाणही घटले आहे. नांगरट थांबल्यारब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केल्या जातात. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरट केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. मात्र पावसाळ्यात तरी पाऊस पडेल का?, याबाबत साशंक असणाऱ्या शेतकऱ्यांनी अद्याप नांगरटीही थांबविल्या आहेत. धरणांची सद्य:स्थितीधरणक्षमताउपलब्ध पाणी (टीएमसी)कोयना१०५३२कण्हेर९.५९२.३८धोम११.६९१.९६उरमोडी९.६५५.४२बलकवडी३.९६०.६५तारळी५.८४२.८५येरळवाडी०.६९निरंक