शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

तांबवे परिसरातील सभासदांना ‘विठ्ठला’ची साद

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

विठ्ठलराव जाधव : तुमची गरज नाही म्हणणाऱ्या अध्यक्षांना धडा शिकवा

तांबवे : ‘तांबवे भागात सभासदांची संख्या मोठी आहे. कारखान्याच्या उभारणीतही या भागाने मोठे योगदान दिले आहे. त्यावेळी इतर कारखान्याच्या तुलनेत ऊसदर कमी मिळत असतानाही सभासदांनी त्याचा विचारही केला नाही. आता मात्र मला तांबवे भागातील सभासदांची गरज नाही असे म्हणणाऱ्या विद्यमान अध्यक्षाला मतपेटीतून धडा शिकवा,’ असे अवाहन कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव यांनी केले. तांबवे, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी पॅनेलच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेलचे प्रमुख लालासाहेब यादव, युवा नेते धैर्यशील कदम, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे, बाळासाहेब जाधव, निवासराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. जाधव म्हणाले, ‘तांबवे येथील एका उमेदवाराने आम्हाला फसवले. खरेतर माझ्या घरात येवूनच आमच्या पॅनेलमधूनच अर्ज भरला होता. पण त्यांना दुर्बुध्दी सुचली आज ते खुलासा करत असले तरी सुबुध्दी असणारे मतदार त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. या भागाला गेल्या काही वर्षांपासून ऊसतोडणी टोळी देण्याच्या नियोजनता सापत्न वागणूक मिळत आहे. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या टोळीला सभासद चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.’ धैर्यशील कदम म्हणाले, ‘सह्याद्री कारखान्याचा अध्यक्ष आणि सचिवही घरचाच. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. पंधरा वर्षांत कारखान्यात विस्तारीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला आहे. साधनसामुग्री खरेदीत मोठा घोटाळा आहे. अम्ही सत्तेवर येताच हे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’मनोज घोरपडे यांनी आमदार फंडातून भागवार ऊस वजन काटे बसवणार असल्याचे अध्यक्ष सांगतायेत असे सांगून त्यांनी काट्यासाठी फंड दिला तर आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देवू असा चिमटा काढला. तसेच आम्ही सत्तेवर येताच कारखाना वाहनतळावर शेतकऱ्यांच्या नियंत्रणामध्ये असणारा ऊस वजनकाटा बसविणार असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)