शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महामार्गावर पुन्हा ‘मेगा ब्लॉक’

By admin | Updated: October 26, 2014 22:36 IST

वडापचा फटका : कोल्हापूर नाक्यावर प्रवाशांची गर्दी, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

कऱ्हाड/मलकापूर : कऱ्हाडात यायचं, तर कोल्हापूर नाका चुकवून चालत नाही आणि कोल्हापूर नाक्यावर जायचं, तर वाहतूक कोंडीत अडकण्याशिवाय गत्यंतर नाही. गत काही महिन्यांपासूनच हे समीकरण. शहराच प्रवेशद्वार असणाऱ्या कोल्हापूर नाक्याला वडापवाल्यांनी घेरलंय. मात्र, या परिस्थितीकडे पाहायला पोलिसांना वेळच मिळत नाही, हे दुर्दैव. रविवारीही वडापचा मोठा फटका बसला. वडाप वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होऊन तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. दिवाळी संपली आणि त्याबरोबरच मुलांच्या, नोकरदारांच्या सुट्याही. उद्या सुटीनंतरचा पहिला सोमवार. त्यामुळे पहिल्याच दिवशी कामावर मुंबईकडे जाण्यासाठी सर्वांचीच घाई सुरू होती़ मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या विचारात घेता रविवारी मात्र वाहने अपुरी पडत होती़ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रवाशांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती़ कोल्हापूर नाका परिसरातही सकाळपासून शेकडो चाकरमान्यांनी गर्दी केली होती़ दुपारी दोनपासून महामार्गावर प्रवाशांची वाहन मिळविण्यासाठी गडबड सुरू झाली़ त्यामुळे प्रवासी मिळविण्यासाठी वडाप व्यावसायिकांसह खासगी बसवालेही धावले. वडाप व खासगी बसचालकांनी आपली वाहने महामार्गावरच थांबविली. परिणामी, अस्ताव्यस्त पार्किंग होऊन वाहने अडकली. वाहनांची गर्दी होऊन कोल्हापूर ते सातारा लेनवर कोंडी निर्माण झाली़ प्रवासी घेण्यासाठी काही वाहनांनी महामार्गावर ठिय्या मांडल्यामुळे शहरातून बाहेर पडणाऱ्या व उपमार्गावरून शहरात जाणाऱ्या वाहनांना रस्ताच बंद झाला़ रस्ता काढण्याच्या प्रयत्नात आडवी वाहने घुसविल्यामुळे बराच गोंधळ उडाला. वाहनांच्या पाच किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या़ कोंडी झाल्यानंतर बराच वेळ एकही पोलीस फिरकला नाही. मात्र, वाहने पुढे सरकणे बंदच झाले, त्यावेळी काही आले. त्यांनी कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न चालवले. मात्र, दुपारी दोन पासून रात्री सातपर्यंत कोंडी फोडण्यात यश आले नव्हते. कोंडी वाढतच असल्याने रात्री आणखी पोलीस कर्मचारी त्याठिकाणी तैनात करण्यात आले. (प्रतिनिधी)