शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
5
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
6
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
7
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
8
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
9
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
10
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
11
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
13
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
14
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
15
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
16
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
17
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
18
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
19
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
20
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी

नवती महोत्सवात मैत्रिणींची भेट

By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST

पुण्यात मेळावा : वाई कन्याशाळेच्या माजी विद्यार्थिनी एकत्र

सातारा : वाई कन्या शाळेच्या नवती महोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थिनींच्या मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या पुणे येथील इचलकरंजी सभाागृहात करण्यात आले होते. प्रसिध्द उद्योजिका आशाताई कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महर्षी आण्णांच्या शिल्पाकृतीस अभिवादन करून मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे सचिव रवींद्र देशपांडे, कार्याध्यक्षा स्नेहलता सहस्त्रबुध्दे, उपकार्याध्यक्ष विश्वास देवल, उपसचिव मुकुंद जोशी, पोपटलाल ओसवाल, मुख्याध्यापिका छाया नायकवडी व नवती महोत्सवाच्या कार्याध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांची प्रमुख उपस्थिती होती.रवींद्र देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुण्या आशाताई कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, ‘महर्षी कर्वे यांनी आपले सारे आयुष्य स्त्री शिक्षणासाठी अर्पित केले आणि म्हणूनच आज स्त्रिया विविध क्षेत्रांत चमकत आहेत.’शालेय समितीचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल यांनी वाई कन्या शाळेची प्रगती आणि विकास कामांची माहिती दिली. नवतीच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या खास शैलीत प्रभावीपणे विषद केले.मेळाव्याच्या अध्यक्षा स्नेहलता सहस्त्रबुध्दे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी १९५५ साली ‘आॅलराऊंड विद्यार्थिनी’ म्हणून महर्षी अण्णांच्या हस्ते ज्यांचा सत्कार झाला होता त्या शालिनी अंजळ यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया नायकवडी यांनी केले. आजन्म सेविका स्वाती शेंडे यांनी नवती महोत्सवाविषयी माहिती सांगितली. पर्यवेक्षिका अनुजा सणस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनीषा देशपांडे यांनी आभार मानले. कविता जगताप यांनी सूत्रसंचालन केले. नीतादेवी गोंजारी, अश्विन भूतकर, वर्षा जोशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.मेळाव्यास डॉ. जयश्री जगताप, अरुण देव, कविता खटावकर, रतन शिंदे, नीला ढवण, जयश्री ओसवाल, विश्वास पवार, मनोज खटावकर यांची विशेष उपस्थिती होती. (प्रतिनिधी)