या बैठकीस नियोजन, वित्त, महसूल, वन, जलसंपदा, ग्रामविकास आदी विभागांचे मंत्री व प्रशासकीय अधिकारी तसेच श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर उपस्थित राहणार आहेत. कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. याचे सर्व श्रेय श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली लढणा-या प्रकल्पग्रस्तांचे आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारला आणि त्याला यश मिळत गेले. त्याचाच भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, बच्चू कडू, प्राजक्त तनपुरे, अदिती तटकरे, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे चैतन्य दळवी, महेश शेलार, मालोजी पाटणकर, सचिन कदम यांनी दिली.