शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा राजीनामा

By admin | Updated: October 3, 2015 23:08 IST

सातारा : विजय बडेकर अन् जयवंत भोसले यांची वर्णी लागणार

सातारा : साताराचे नगराध्यक्ष सचिन सारस व उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता नगराध्यक्षपदावर सातारा विकास आघाडीचे विजय बडेकर तर उपनगराध्यक्षपदासाठी नगर विकास आघाडीचे जयवंत भोसले यांचे नाव निश्चित झाले आहे. पालिकेच्या विशेष सभेत त्यांची निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून नगराध्यक्ष सचिन सारस यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दोन्ही आघाड्यांमधून प्रयत्न सुरू झाले होते. दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावर चर्चा केली होती. त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सारस यांना राजीनामा देण्यास सांगितले. दोन्ही आघाड्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ विभागून घेतला होता. नगराध्यक्षांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा पूर्ण झाला मात्र, उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांना पाच महिने दहा दिवसच काम करण्याची संधी मिळाली. ही मुदत संपल्याने शनिवारी दुपारी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी त्यांचा राजीनामा नगराध्यक्ष सचिन सारस यांच्याकडे दिला. त्यानंतर नगराध्यक्ष सचिन सारस यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे राजीनामा दिला. यावेळी दोन्ही आघाड्यांतील नगरसेवक उपस्थित होते. आता पुढील सव्वा वर्षासाठी सातारा विकास आघाडीचे विजय बडेकर यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीचे जयवंत भोसले यांचे नाव निश्चित झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पालिकेची विशेष सभा बोलावून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)