शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : माथेफिरूने केला पुन्हा पोलिसावर हल्ला, तोंडावर ओरखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:02 IST

महिनाभरापूर्वी एका पोलिसावर हल्ला केलेल्या माथेफिरूने पुन्हा आणखी एका पोलिसावर पुन्हा हल्ला केला. यामध्ये संबंधित पोलीस जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमाथेफिरूने केला पुन्हा पोलिसावर हल्लातोंडावर ओरखडे ; पोलीस जखमी

सातारा : महिनाभरापूर्वी एका पोलिसावर हल्ला केलेल्या माथेफिरूने पुन्हा आणखी एका पोलिसावर पुन्हा हल्ला केला. यामध्ये संबंधित पोलीस जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीत कार्यरत असलेले हवालदार अजयराज देशमुख हे सोमवारी सकाळी अकरा वाजता बसस्थानक परिसरामध्ये दुकाने बंद करा, असे सांगत फिरत होते. त्यावेळी संबंधित व्यक्ती तेथून जात होती. देशमुख यांनी त्या व्यक्तीला कुठे फिरताय, असे विचारले.

यावरून संबंधित माथेफिरूने देखमुख यांच्या चेहऱ्यावर हाताने ओरबडले. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. त्यांचे ओठही सुजले. या प्रकारानंतर इतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. या ठिकाणी त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने महिनाभरापूर्वीही एका पोलिसावर हल्ला केल्याचे समोर आले.

या माथेफिरूकडून दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने पोलिसांकडूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित माथेफिरूवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर