शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

राजधानीत उसळला मराठ्यांचा जनसागर, आरक्षणासाठी साताऱ्यात भव्य रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 12:01 IST

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या फोटोसह व्यर्थ न हो बलिदान! असे लिहिलेल्या बॅनरच्या साक्षीने साताऱ्यात आज सकाळी हजारो मराठा बांधवांचा जनासागर उसळला...एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देराजधानीत उसळला मराठ्यांचा जनसागर आरक्षणासाठी साताऱ्यात भव्य रॅलीसंपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद

सातारा : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या फोटोसह व्यर्थ न हो बलिदान! असे लिहिलेल्या बॅनरच्या साक्षीने साताऱ्यात आज सकाळी हजारो मराठा बांधवांचा जनासागर उसळला...एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

मराठा आरक्षणासाठी अन् काकासाहेब शिंदे यांच्या हौतात्म्याला न्याय देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव बुधवारी सकाळी राजवाड्याजवळ जमले. आबालवृद्ध अन् तरुण-तरुणी यांच्यासह सर्वच स्तरातील अन् वयोगटातील मंडळी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या होत्या. भगवे ध्वज मोर्चात दिमाखात झळकत होते.

मोर्चाच्या अग्रस्थानी काळ्या पोशाखातील महिलांची दुचाकी रॅली लक्ष वेधून घेत होती. हजारो दुचाकींवरून कार्यकर्त्यांची रॅली राजवाड्यावरून राजपथमार्गे पोवई नाक्याकडे सरकली. या ठिकाणी ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असूनही शिस्तबद्ध कार्यकर्त्यांमुळे रॅली व्यवस्थितपणे पुढे सरकली.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या घोषणा अधिकच तीव्र होत गेल्या. कोण म्हणतंय देत नाय... घेतल्याशिवाय राहत नाय, म्हणत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असाही निर्धार अनेकांनी केला.

दरम्यान, सातारा जिल्हा बंदला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आज एसटी, खासगी वाहने, शाळा-महाविद्यालये, पेट्रोलपंप अन् यासह संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर