शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहिता आत्महत्याप्रकरणी पतीसह तिघांना सक्तमजुरी

By admin | Updated: February 8, 2017 22:50 IST

एका वर्षात खटल्याचा निकाल; इंगळेवाडीतील घटना

सातारा : शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी पती व दीर यांना पाच तर सासऱ्याला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.पती नितीन चंद्रकांत घोरपडे (वय ३६), दीर दीपक चंद्रकांत घोरपडे (२८) व सासरा चंद्रकांत घोरपडे (७२, रा. इंगळेवाडी, नुने, ता. सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. इंगळेवाडी येथे ७ जानेवारी २०१६ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सावित्रा नितीन घोरपडे (वय ३०) हिने घरासमोर अंगावरॉकेल ओतून पेटवून घेतले होते. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सावित्रीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. तत्पूर्वी तिने पोलिसांना मृत्युपूर्व जबाब दिला होता. ‘लग्नात हुंडा दिला नाही, काम येत नाही, कामाला बाहेर जात नाही,’ या कारणावरून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक त्रास दिला होता. त्या त्रासाला कंटाळून पेटवून घेतल्याचे तिने जबाबात म्हटले होते. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात पती, सासरा आणि दिरावर गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हेमंत साठे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्रा' मानून न्यायालयाने पती, सासरा आणि दिराला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)