शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

ठसे उमटले...गूढ उकलले !

By admin | Updated: June 20, 2016 00:28 IST

दीड वर्षात पाच घरफोड्या, एक खून उघडकीस : शातीर चोरटे बनतायत क्राईम ब्रँचची डोकेदुखी

 दत्ता यादव ल्ल सातारा कितीही शातीर गुन्हेगार असला तरी गुन्हा केल्यानंतर तो पुरावा मागे सोडून जातोच, असे म्हटले जाते; मात्र अलीकडच्या काळामध्ये हायटेक गुन्हेगार सक्रिय झाल्यामुळे पोलिसांना मागे पुरावे मिळेनासे झाले आहेत; परंतु सातारा पोलिसांनी यावर मात करून तब्बल पाच घरफोड्या आणि एक खून फिंगर प्रिंटच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे. चोरटे शातीर होत चालले असताना पोलिसांनी कौशल्याने केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलिस दलामध्ये अजूनही तपासाच्या अनुषंगाने पारंपरिक पद्धती अवलंबल्या जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारापर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड बनत आहे. पूर्वी ‘डॉग स्कॉड आणि फिंगर प्रिंट’ यावरच पोलिसांची मदार असायची. घटनास्थळी पोलिसांना काहींना काही तरी पुरावा सापडत होताच, त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाणही शंभर टक्के होते; मात्र जसजसा काळ बदलला तसतशा गुन्हेगारांच्या पद्धतीही बदलत गेल्या. सायबर क्राईम आणि कॉल डिटेल्सवर पोलिसांना भर द्यावा लागला. गेल्या दहा-बारा वर्षांत पोलिसांना गंभीर किंवा किरकोळ गुन्ह्यांमध्येही फिंगर प्रिंट मिळत नव्हते. घटना घडून गेल्यानंतर संबंधित व्यक्ती ठसे मिळणार नाहीत, याची काळजी घेत होते. त्यामुळे फिंगर प्रिंटद्वारे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही अत्यल्प होते. वर्षभरात केवळ एक किंवा दोन गुन्हे उघडकीस यायचे; परंतु सातारा पोलिस दलातील क्राईम ब्रँचच्या टीमने आपले कौशल्य वापरून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. गेल्या दीड वर्षात पाच घरफोड्या आणि एक खून उघडकीस आणून राज्य पोलिस दलात एक मानाचा तुरा खोवला. बोरगाव, कोरेगाव, शाहूपुरी, सातारा तालुका, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यात क्राईम ब्रँचला यश आले. ...अन् बिअरच्या बाटलीवर ठसा कोरेगाव येथे सहा महिन्यांपूर्वी एका युवकाचा बिअरची बाटली पोटात खुपसून खून करण्यात आला होता. घटनास्थळी बिअरची बाटली होती. या बिअरच्या बाटलीवर संबंधिताची फिंगर प्रिंट मिळाली. त्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली. फिंगर प्रिंट सापडल्यास शंभर टक्के शिक्षा ! न्यायालयात अनेकदा साक्षीदार पलटल्यामुळे आरोपी सहीसलामत सुटत असतात; मात्र असा एक पुरावा आहे, तो म्हणजे फिंगर प्रिंट. इतर पुरावे डळमळीत झाले तरी हा पुरावा कधीही डळमळीत होत नाही. त्यामुळे या पुराव्याच्या आधारे संशयिताला शंभर टक्के शिक्षा लागतेच. असा होतो फिंगर प्रिंटचा प्रवास ! कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांची जितकी महत्त्वाची भूमिका आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने क्राईम ब्रँचची जबाबदारी मोठी आहे. या टीमने फिंगर प्रिंटचे रिपोर्ट सादर केल्याशिवाय पोलिसांचा तपास पुढे सरकत नाही. घटनास्थळी फिंगर प्रिंट सापडल्यानंतर ठसेतज्ज्ञ मार्किंग करतात. फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्यानंतर ती प्रिंट डेव्हलप करून पुणे क्राईम ब्रँचला पाठविली जाते. या ठिकाणी १५ जणांची टीम असते. या टीमच्या प्रत्येकाचे मत जाणून घेऊन फिंगर प्रिंट मॅच केली जाते. त्यानंतरच संबंधित फिंगर प्रिंट नेमकी कोणाची आहे, हे समोर येते. या प्रक्रियेला साधारणता पंधरा दिवसांचा कालावधी लागतो.कोरेगाव येथे सहा महिन्यांपूर्वी एका युवकाचा बिअरची बाटली पोटात खुपसून खून करण्यात आला होता. घटनास्थळी बिअरची बाटली होती. या बिअरच्या बाटलीवर संबंधिताची फिंगर प्रिंट मिळाली. त्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली. नागरिकांनी काय करू नये ! एखाद्याच्या घरात चोरी झाल्यानंतर त्या कुटुंबाला साहजिकच मानिसक धक्का बसतो. आपल्या घरातील नेमके काय-काय चोरीला गेले आहे. या भीतीपोटी घरातील लोक कपाट उघडून साहित्याची तपासणी करतात. याचवेळी त्यांच्या हाताचे ठसे तेथे उमटतात. त्यामुळे ठसेतज्ज्ञांना चोरट्यांचे ठसे सापडत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी पोलिस येईपर्यंत कोणत्याही वस्तूला हात लावू नये. थोडा धीर धरावा, असे आवाहनही पोलिस वारंवार करतात; मात्र याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केल्यामुळे फिंगर प्रिंट सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अत्यल्प होत आहे.