शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत नाही कांदा... शेतकऱ्यांचा झालाय वांदा !

By admin | Updated: July 29, 2015 21:41 IST

बाजारपेठ ओस : आवक मंदावल्याने दर कडाडले

खंडाळा : सातारा जिल्ह्णातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लोणंद बाजार समितीकडे पाहिले जाते. परंतु सध्या बाजार समितीत कांद्याची आवक नगण्य असल्यामुळे भाव कडाडले आहेत. लोणंद बाजार समितीत या आठवड्यात कांद्याचा दर क्विंटलला तीन हजारांपर्यंत पोहोचला आहे.प्रतिकिलो ठोक बाजार तीस रुपये असला तरी शेतकऱ्यांकडे सध्या कांदा उपलब्ध नसल्याने बाजारपेठ ओस पडली आहे.लोणंद परिसर हे कांद्याचे आगार मानले जाते. मात्र, येथील शेतकरी कांदा साठवण करीत नाही. शेतातून निघणारा माल थेट बाजारात नेला जातो. सध्या कांद्याचा मोसम सुरू नाही. शेतकऱ्यांच्या शेतातही कांदा नाही. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक नाही. किरकोळ स्वरूपात केवळ ५० ते १०० च्या आसपास कांदा पिशवी बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजारांपेक्षा जास्त दर क्विंटल मिळत आहे; पण कांदा आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी अवस्था सध्या आहे.तालुक्यात हळवा कांदा व गरवा कांदा अशा दोन प्रकारांची पिके घेतली जातात. सध्या हळव्या कांद्याचा मोसम आहे. मात्र, हा कांदा दिवाळीच्या दरम्यान निघत असतो आणि गरव्या कांद्याचा साठा शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे बाजारात कांद्याची कमतरता आहे. त्यामुळेच कांद्याचे दर कडाडले आहेत. बाजारात उपलब्ध होणाऱ्या कांदा पिशवी खरेदीसाठी व्यापाऱ्यांची मात्र चढाओढ पाहायला मिळत आहे. मर्यादित कांद्याची आवक व्यापऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. बाजारपेठेत कांदा उपलब्ध होण्यासाठी अजूनही तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. (प्रतिनिधी)लोणंद बाजार समितीत सध्या कांद्याची आवक नाही. किरकोळ ५० ते ६० पिशव्यांची आवक होते. त्यासाठी प्रतिकिलो तीस रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. हळवा कांदा चालू झाल्यावर बाजारात आवक वाढेल.- प्रकाश धापते, सचिव, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती