शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तमिळनाडूतील साजरागडावर मराठी शिलालेख, साताऱ्यातील तरुणांचे दक्षिण भारतात संशोधन 

By सचिन काकडे | Updated: December 26, 2023 16:12 IST

सातारा : साताऱ्यातील दुर्गवेड्या तरुणांच्या प्रयत्नातून तामिळनाडू राज्यातील साजरा गडावर असणारा मराठी शिलालेख उजेडात आला आहे. हा शिलालेख चार ...

सातारा : साताऱ्यातील दुर्गवेड्या तरुणांच्या प्रयत्नातून तामिळनाडू राज्यातील साजरागडावर असणारा मराठी शिलालेख उजेडात आला आहे. हा शिलालेख चार ओळींचा असून, इतिहास अभ्यासकांनी त्याचे वाचनही केले आहे.तामिळनाडूतील वेलूर प्रांतातील पंचवीस किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते. त्यात साजरागड अन् गोजरागड या किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले सध्या अर्काट जिल्ह्यात आहेत. त्यातील साजरागड या किल्ल्यावर काही वर्षांपूर्वी पुसेगाव (ता. खटाव) येथील अनिकेत वाघ व अमर भाऊ या इतिहास अभ्यासक असलेल्या युवकास छत्रपती शिवरायांचे शिल्प आढळले होते. त्यानंतर नुकतीच खटाव येथील इतिहास अभ्यासक कुमार गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिणेतील गडकोटांची अभ्यास मोहीम यशस्वी केली. यावेळी त्यांनी किल्ल्यावरील अन्य शिल्पांचा शोध घेतला तेव्हा पहिल्या अन् दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्यांच्या भिंतीवर एक शिलालेख आढळून आला. या शिलालेखाभोवती काटेरी झुडपे वाढली होती. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात मातीही होती. दोन- तीन तासाच्या सफाईनंतर तो शिलालेख वाचण्यायोग्य झाला. त्याचे वाचन करून तो शिलालेख अभ्यासकांना पाठवण्यात आला.इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे, अनिकेत वाघ यांनी शिलालेखातील मजकुरावर काम केले. 'जिज्ञासा मंच'चे नीलेश पंडित, प्रवीण भोसले यांचेही या शिलालेखाबाबत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या शोध मोहिमेत कुमार गुरव  (खटाव) यांच्यासह सूरज नाळे (जाधववाडी, ता. कोरेगाव), नीलेश सुतार (झगलवाडी, ता. खंडाळा) यांनी सहभाग घेतला. शिलालेखावरील माहिती अशी..युवकांनी शोधलेला हा शिलालेख देवनागरी लिपीत आहे. तो चार ओळींचा आहे. त्यातील मजकूरानुसार रवळोजी जाधव यांची गडावर हवालदार म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगड