शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha ओगलेवाडीत जाळपोळ; कऱ्हाडात महामार्ग रोखला, कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 12:35 IST

मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी व्यापारी, विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. गुहाघर-विजापूर महामार्गावर ओगलेवाडी येथे सकाळी रस्त्यावर टायर पेटवून दिल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देओगलेवाडीत जाळपोळ; कऱ्हाडात महामार्ग रोखला, कडकडीत बंदगुहाघर-विजापूर मार्गावर टायर पेटविले; कडक पोलीस बंदोबस्त

कऱ्हाड : मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी व्यापारी, विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. गुहाघर-विजापूर महामार्गावर ओगलेवाडी येथे सकाळी रस्त्यावर टायर पेटवून दिल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

मराठा आरक्षणासाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी युवकांनी दुचाकी रॅली काढली. घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी रस्त्यावर पेटत असलेले टायर बाजूला काढले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मराठा आरक्षणासाठी सध्या रान पेटले आहे.

एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी कऱ्हाडात पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेतही हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. पदयात्रा आणि ठिय्या आंदोलनामुळे आंदोलनाचे वातावरण तयार झाले असतानाच बुधवारी बंदची हाक देण्यात आली.

शहरात सकाळपासूनच सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. शहरासह ग्रामीण भागातही बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.दुचाकी रॅलीस प्रतिसादमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी युवकांनी दुचाकी रॅली काढली. या रॅलीत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगव्या टोप्या आणि झेंडे हातात घेतलेले युवक दुचाकीवरून बसस्थानकमार्गे मुख्य बाजारपेठेतून कृष्णा नाक्यावर व पुन्हा बसस्थानकमार्गे कार्वे नाक्याकडे मार्गस्थ झाले. यावेळी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर