शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जिल्ह्यातील अनेक गावांत मृतदेहांची अवहेलना-अंत्यसंस्कारासाठी पुरेशा सुविधा नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:37 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे.

ठळक मुद्देस्मशानशेड नसल्याने रस्त्याकडेला अगर उघड्या माळावरच दहन

श्रीकांत ºहायकर।धामोड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. काही ठिकाणी तर स्मशानशेड नसल्याने उघड्यावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गोतेवाडी गावाची अवस्था याहून वेगळी नाही. ‘गाव नुसते नावाला, स्मशानशेड नाही गावाला’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. स्मशानशेड नसल्याने रस्त्याकडेला अगर उघड्या माळावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, आजरा या तालुक्यांत धरण पाणलोट क्षेत्रात व परिसरातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. या तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये आजही स्मशानशेड नसल्याने पावसाळ्याच्या दरम्यान या गावातील एखाद्या ग्रामस्थांचे निधन झाले तर त्याच्या अंत्यविधीला अनेक अडथळे येतात. प्रसंगी पत्रे लावून, छत्र्या धरून अंत्यविधी करावा लागतो. काहीवेळेला तर सरण जळतच नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणीही मृतदेहाची हेळसांड होते. त्यामुळे ‘गाव तेथे स्मशानभूमी शेड’ होणे गरजेचे आहे. पण, हे वास्तव असले तरी जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये आजही स्मशानशेड नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी उघड्यावरच मृतदेहांवर अंत्यसंस्काराची सोपस्कार करावी लागतात.

डोंगराळ दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये लोकसंख्या कमी असते. त्यामुळे या ठिकाणी प्रशासन आणि राजकारणी लोकही या समस्येकडे सहजासहजी लक्ष देत नाहीत. काही ठिकाणी जागेचा प्रश्न आहे; काही लोक स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी तयार नाहीत. सरकारी जागा जरी असली तरी त्याच्याशेजारी असणारा खासगी जागामालक स्मशानभूमीस विरोध करीत असल्याचे चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळते. परिणामी ग्रामपंचायत प्रशासनाची इच्छा असतानादेखील केवळ जागेअभावी किंवा गावातील अंतर्गत राजकीय कलहातून ‘स्मशानशेडचाच बळी’ जातो आहे.

ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने स्वखर्चातून सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारणे म्हणजे अग्निदिव्यच. काही वेळेला पाणी बिल तसेच वीज बिल भागविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे गावच्या इतर सुख-सोयी, सुविधा पुरविणे डोईजड होऊन बसते. त्यामुळे राज्य सरकारने ग्रामपंचायतीची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतींना १४ वा वित्त आयोगातून दरवर्षी लाख रुपयांचा निधी देण्याचे धोरण आखले आहे, पण त्यातून स्मशानशेड दुरुस्ती किंवा देखभालीबाबत फारशी शिफारस केली जात नाही.कोतेत रस्त्यावरच अग्निसंस्कारकोते ( ता. राधानगरी) ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणारे गोतेवाडी हे गाव आजही स्मशानशेडविना मृतदेहांवर अग्निसंस्कार रस्त्यावरच करीत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजअखेर या गावाला स्मशानशेड मिळालेले नाही परिणामी शेवटचा दिवस तरी गोड जावा, अशी आशा बाळगणाऱ्या माणसांच्या मृतदेहांची चाललेली ही एकप्रकारे विटंबनाच आहे. किमान आतातरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन मृतदेहांची विटंबना थांबवावी व गावकºयांनाही या त्रासातून मुक्त करावे, एवढीच अपेक्षा. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDetroitडेट्राॅइट