शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

अनेक खाल्ल्या खस्ता... लॉकडाऊनमध्ये अखेर तयार केला रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 3:44 PM

CoronaVirus Satara : अंगापूर तर्फ तारगाव या गावाने आपल्या एकीचे दर्शन घडवीत कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता गावशिवारातील तब्बल नऊ किलोमीटरचे रस्ते मुरमीकरण व मजबूतीकरण करत स्वखर्चाने तयार केले. अनेक पिढ्यांपासून असलेली शेतीची व स्वत:ची फरपट इतिहासजमा केली.

ठळक मुद्देअनेक खाल्ल्या खस्ता... लॉकडाऊनमध्ये अखेर तयार केला रस्ता! अंगापूर तर्फ ग्रामस्थांच्या एकीतून तब्बल नऊ किलोमीटरचा रस्ता तयार

अंगापूर : अंगापूर तर्फ तारगाव या गावाने आपल्या एकीचे दर्शन घडवीत कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता गावशिवारातील तब्बल नऊ किलोमीटरचे रस्ते मुरमीकरण व मजबूतीकरण करत स्वखर्चाने तयार केले. अनेक पिढ्यांपासून असलेली शेतीची व स्वत:ची फरपट इतिहासजमा केली.मुळातच बागायती, काळवट व सुपीक जमीन पावसामुळे चिखलमय होत असे. चालत जाणेही अशक्य असताना वाहने कशी जाणार? त्यामुळे गेली कित्येक वर्षे या परिसरातील शेतमाल शेतकऱ्यांच्या घरी पोहोचताना नाकीनऊ होत होते. पावसाळ्यात कित्येक वेळा पिके तिथेच कुजून नष्ट होत होती. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी सहन करत होते.

ऊसकाढणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर तर ग्रामस्थांना अग्निदिव्यच करावे लागत होते. रस्ता नीट नसल्यामुळे सडणारे पीक व होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा पर्याय ग्रामस्थांकडे नव्हता.लॉकडाऊन त्यातच उन्हाळ्यात शेतीची कामे कमी असल्याने गावातील लोकांना कामे कमी प्रमाणात होती. उरलेल्या वेळेत काहीतरी शाश्वत काम करावे जेणेकरून गावाचा एखादा प्रश्न कायमचा मिटला जाईल, या विचाराने अंगापूर तर्फ ग्रामस्थांची आमदार महेश शिंदे यांच्या समवेत एक बैठक झाली. त्यात पाणंद व शेतशिवार रस्ते दुरुस्तीचा विषय घेण्यात आला. सुरुवातीला गावातील काही जणांनी वेगवेगळ्या अडचणी मांडत यास विरोध केला. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा सोडविण्याचा जणू चंगच बांधला.मुळातच शेतीप्रिय व त्यातून आर्थिक सुबत्ता प्राप्त झालेल्या या गावाने क्षणाचाही विलंब न लावता या कामास हात घातला. रस्त्यांच्या आजूबाजूला व दुतर्फा शेती असणाऱ्या प्रत्येकाकडून प्रतिगुंठा पन्नास रुपयांप्रमाणे रक्कम आकारण्याचे ठरविल्याने रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. हे काम मोठे असल्याने यंत्रसामग्री आवश्यक होती.

यासाठी आमदार शिंदे यांनी पोकलँड मशीन स्वखर्चाने देत मोठा अडथळा दूर केला. त्यामुळे तर गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या कामाला मोठे बळच मिळाले. गावातील जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर वाहने वापरायला दिली. तब्बल एक महिनाभर चाललेल्या या कामाने अनेक वर्षांची फरपट थांबविली. दोन पाणंद तर दोन कालव्यावरील रस्ते तयार करून मुख्य रस्त्यांना जोडले.रस्त्याचा लेखाजोखा..

  • लोकसहभाग रकमेतून-सात लाख
  • सहभागी वाहनांसाठी डिझेल- दररोज खर्च २५ ते ३० हजार

 

  • यंत्रणा- १ पोकलँन्ड,१ जेसीबी, ३ डंपर,२० ट्रॅक्टर
  • कालावधी -२३ दिवस

 

  • पाणंद रस्त्यामुळे होणार फायदा
  • वाहनांचे बारमाही दळणवळण होण्यामुळे शेतीत तरुणांचा सहभाग वाढणार
  • ऊसतोड वेळेत झाल्यास खर्च वाचणार
  • पावसाळ्यातही सोयाबीन, तरकारी पिके घेता येणार
  • शेतीची मशागत, वरखते, जनावरांचा चारा ने-आण करण्यास सोईस्कर होणार
  • शेळीपालन, कुक्कुटपालन, गाई, म्हशी पालन या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार
  • गावच्या आर्थिक सुबत्तावाढीस चालना मिळणार

गेली अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी खस्ता खाल्ल्या. नुकसान सहन केले. आता मात्र गावकऱ्यांच्या सहभागातून तयार झालेल्या या रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीच्या मरणयातना संपून शेतीच्या नव्या आशा निर्माण झाल्या.- जयवंत शेडगे,ज्येष्ठ नागरिक, अंगापूर तर्फ तारगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याroad transportरस्ते वाहतूकSatara areaसातारा परिसर