दहिवडी : वारुगड विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मानसिंग पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सोसायटीचे चेअरमनपद रिक्त होते. आज निवडणूक निर्णय अधिकारी गीतांजली कुंभार, सचिव सतीश कदम यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये मानसिंग पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायतीत अवघ्या तीन मतांनी पवार यांचा पराभव झाल्याचे शल्य होते. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली. या सोसायटीवर आमदार जयकुमार गोरे यांचे वर्चस्व आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पवार यांना चेअरमनपदाची संधी मिळाली. या निवडीबद्दल त्यांचे आमदार जयकुमार गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, परकंदीचे सरपंच बाळासाहेब कदम, माजी सरपंच दिलीप कदम, नवनाथ शिंदे, लक्ष्मण जाधव, दत्तात्रय जाधव, सतीश मदने, मारुती बोडरे, संचालक जनार्दन गाडे, तानाजी क्षीरसागर, निवृत्ती बोडरे, राजाराम सांळुखे, मोहन भगत, शालन शिंदे यांनी कौतुक केले.
०३दहिवडी
फोटो-वारुगड सोसायटीच्या चेअरमनपदी मानसिंग पवार यांची निवड झाल्यानंतर समर्थकांनी आनंद साजरा केला.