शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Satara Politics- घडतंय बिघडतंय: उत्तर कऱ्हाडमध्ये 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटतयं ?

By प्रमोद सुकरे | Updated: August 1, 2025 12:07 IST

आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळांचीही मांडीला मांडी 

प्रमोद सुकरे कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपचे आमदार मनोज घोरपडे, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनेल उभी  केली. त्यामुळे व्हायचं तेच झालं. पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना हे 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटताना दिसत आहे. कारण मतदारसंघातील अनेक कार्यक्रमाला मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळ आता मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहायला मिळत आहे.खरंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराडसह सातारा,खटाव व कोरेगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.त्यामुळे येथील राजकीय समीकरणेही इतर मतदारसंघापेक्षा निश्चितच वेगळी आहेत. या मतदारसंघात यापूर्वी अनेकदा तिरंगी लढती झाल्या आणि त्याचा फायदा नेहमीच सत्ताधारी आमदारांना झाला. पण गत विधानसभा निवडणुकीत यापूर्वी एकमेकांविरोधात लढलेल्या मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांचे 'मनो-धैर्य' भाजप नेत्यांनी एकवटले.त्यामुळे मतदार संघात परिवर्तनाचे 'कमळ' फुलले.पण विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली.माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याची निवडणूकही भाजप ताकतीने लढेल असे बोलले जात होते.तशी तयारीही सुरू दिसत होती. मात्र या निवडणुकीत 'मनो-धैर्य' पुन्हा विस्कटले. प्रत्यक्षात मैदानात ३ पॅनेल उतरली अन सत्ताधाऱ्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.पण त्यामुळे भाजप अंतर्गत नेत्यांच्यात राजकीय तणाव वाढला. पण तो आता निवळत चाललेला पाहायला मिळतोय.नुकताच कराड तालुक्यातील बनवडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार मनोज घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ ही मंडळी एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेली दिसली.त्यानंतर शामगाव व पुसेसावळी येथील कार्यक्रमात सुध्दा हे सगळे एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्यात याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत.

एकमेकांवर केली होती टोकाची टीका ..सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रचारात मुख्य विरोधकांच्या ऐवजी या भाजपच्या दोन्ही पॅनेलच्या  नेत्यांनीच एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमात या नेत्यांचा अबोला कायम दिसला.त्यामुळे हे अंतर आता वाढत जाईल असे बोलले जात होते. पण सध्या तरी या कार्यक्रमातून हे चित्र बदलताना दिसत आहे .

राजकारणात कोणच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो  राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे 'सह्याद्रीच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत बदलले असले चित्र तरी ते होणारच नाहीत पुन्हा एकमेकांचे मित्र' असे म्हणता येणार नाही.आता तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका समोर आहेत.त्यामुळे ही राजकीय गरज म्हणून ते एकत्रित दिसतात की हे चित्र वरवरचे आहे हे येणार्या काळात स्पष्ट होईलच.