शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

मानाच्या गणपतींनी दिले सातारकरांना दर्शन

By admin | Updated: September 4, 2016 23:47 IST

शाहूनगरी सजली : हरळी, विद्युत रोषणाई अन् मोदकांना मागणी वाढली

सातारा : अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी येणाऱ्या गणरायांच्या स्वागतासाठी साताऱ्यातील बाजारपेठ फुलली आहे. शहरातील जुना व मानाचा गणपती म्हणून ओळखला जात असलेल्या सम्राटच्या महागणपतीचे रविवारी थाटात स्वागत केले. चांदीची आभूषणे परिधान केलेली बाप्पाची मूर्ती वाजत-गाजत मंडपात आणली. गणेशाचे आगमन सोमवार, दि. ५ रोजी होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मूर्ती रविवारी दिवसभर ट्रॅक्टरमधून नेली जात होती. घरगुती पूजेसाठी गणेशमूर्तीची नोंदणी केली जात होती. या मूर्ती सोमवारी सकाळी घरोघरी नेल्या जाणार आहेत. गणेशाचे सोमवारी आगमन होणार असले तरी तरुणाईला सजावटीचे वेध आगले आहेत. शाळा-महाविद्यालय व कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने चांगली खरेदी करता आली. बाजारपेठेत दिवसभर गर्दी दिसून येत होती. पूजेसाठी आवश्यक असणारे हरळी, आघाडा, फुले विक्रेत्यांनी मोती चौकीत गर्दी केली होती. (प्रतिनिधी) आधुनिक पडद्यांचे खास आकर्षण गौरी-गणपतींना पडदे टाकून आकर्षक सजावट केली जाते. यामध्ये काही ठिकाणी प्लास्टिक पाईपचा वापर करून रेडिमेड पडदे विक्रीस आले आहेत. आकर्षक रंगछटामुळे त्यांना चांगली मागणी आहे. सुवासिनींनी धरला हरतालिकेचा उपवास गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो. सातारा शहरासह जिल्ह्यातील महिलांनीही हरतालिकेची पूजा करून उपवास धरला. शहरात नदीकाठची वाळू सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने राजवाडा परिसरात छोट्या-छोट्या मूर्ती विक्रीस आल्या होत्या. गणपती बाप्पा रवाना जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांतील गणेशमूर्ती रविवारी साताऱ्यातून नेण्यात आल्या. त्या-त्या गावातून आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया....’चा जयघोष करत ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणेशमूर्ती गावी नेले.