शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणीतील स्वच्छतेचा मंगोलीयन गरुडांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:41 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : केवळ पाचगणीत दृष्टीस पडणाºया मंगोलिया तील स्थलांतरित स्टेपी गरुडांची संख्या यंदा झपाट्यानं कमी झाली आहे. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या पाचगणी पालिकेने कचरा डेपोचे सपाटीकरण केले. स्वच्छतेच्या दृष्टीने ही बाब कौतुकास्पद असली तरी विदेशी गरुडांना मिळणारे खाद्य मातीखाली गाडले जात आहे. परिणामी खाद्याची कमतरता जाणवू ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : केवळ पाचगणीत दृष्टीस पडणाºया मंगोलियातील स्थलांतरित स्टेपी गरुडांची संख्या यंदा झपाट्यानं कमी झाली आहे. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या पाचगणी पालिकेने कचरा डेपोचे सपाटीकरण केले. स्वच्छतेच्या दृष्टीने ही बाब कौतुकास्पद असली तरी विदेशी गरुडांना मिळणारे खाद्य मातीखाली गाडले जात आहे. परिणामी खाद्याची कमतरता जाणवू लागल्याने या दुर्मीळ पक्ष्यांनी यंदा पाचगणीकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे.हिवाळ्यात मंगोलियात बर्फवृष्टी सुरू झाल्यास या गरुडांना मिळणारे खाद्य बर्फाखाली गाडले जाते. त्यामुळे हे गरूड खाद्याच्या शोधार्थ चार ते पाच महिने अन्यत्र स्थलांतर करतात. भारतात काही ठिकाणी हे गरूड आढळून आले असले तरी सातारा जिल्ह्यात केवळ पाचगणीतच गेल्या पंधरा वर्षांपासून हे गरूड नजरेस पडत आहेत. त्याला कारणही तसेच आहे.पाचगणीतील कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात शहरातील कचरा गोळा करून टाकला जातो. असंख्य हॉटेल्समुळे या कचºयात मांसाच्या तुकड्याचे प्रमाणही अधिक असते. मांसाचे तुकडे, साप अन् उंदीर हे गरुडांचे मुख्य खाद्य असल्याने कचरा डेपोत गरुडांची संख्या शेकडोंच्या घरात होती. पूर्वी तीनशे ते चारशे पक्ष्यांचा थवा या ठिकाणी नजरेस पडत असे. मात्र, यंदा अत्यंत कमी आहे. आता पाच ते दहागरूडच पाहावयास मिळतात. खाद्याच्या शोधार्थ हजारो मैल प्रवास करून सातारा जिल्ह्यात विसावा घेणाºया या पक्ष्यांना आता खाद्याअभावी आपले विसाव्याचे क्षेत्रच बदलावे लागत आहे.गरुड असो की इतर पक्षी यांची नैसर्गिक अन्नसाखळी खंडित झाल्यास ते आपल्या अधिवासाचे क्षेत्र बदलतात. पाचगणीत येणाºया स्टेपी गरुडांच्या बाबतीततही असेच काहीसे घडले आहे. शहराचा विकास साधत असताना या विदेशी पक्ष्यांचे अस्तित्वही टिकायला हवे, यासाठी उपाययोजनेची मागणी होत आहे.ंही आहेत वैशिष्ट्यभारतात आढळणाºया गरुडांपेक्षा मंगोलियातील गरूड हा आकारमानाने, वजनाने अन् रंगाने भिन्न असा आहे.या गरुडास इंग्रजीत स्टेपी गरूड तर मराठीत नेपाळी गरूड या नावानेओळखले जाते.याची उंची दीड ते पावणे दोन फूट इतकी असते.वजन सुमारे दहा ते बारा किलो असते.या गरुडाच्या पंखांची लांबी सुमारे५ ते ६ फूट इतकी असते.डोकं चपटं, चोच लांबडी अन् बागदार असते.याच्या पायावर केस असतात. याची संपूर्ण ताकद ही त्याच्या पायांमध्येच असते.भारतात आढळणारे गरूड स्टेपी (नेपाळी) गरुडाच्या तुलनेत आकाराने लहान व वजनाने कमी असतात.यांच्या पंखाची लांबीही कमी असते.