शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बागायतदार चिंताग्रस्त

By admin | Updated: October 26, 2014 23:24 IST

पावसामुळे धोका : हंगाम लांबण्याची शक्यता

रत्नागिरी : आॅक्टोबर हीट बरोबर आता परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. गेले दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश झाडांना पालवी आली असून शेतकरी थंडीच्या प्रतिक्षेत आहेत.यावर्षी दिवाळीत आॅक्टोबर हीट मोठ्या प्रमाणावर होती. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यत उन्हाचे चटके असह्य होत होते. परंतु अमावस्येनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. परतीचा पाऊस सायंकाळी हजेरी लावत असे परंतु गेले दोन दिवस रात्री तसेच दिवसाही कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पावसामुळे कुजण्याची भिती निर्माण झाली आहे.थंडीचा पत्ता नसल्यामुळे आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहोर प्रक्रिया सुरू होते. पालवीचे प्रमाण अधिक असून पालवीवर तुडतुडा, चिकट्या रोगाचा (बुरशीसदृश्य) प्रादूर्भाव दिसून येत आहे. काही बागायदारांनी पालवीवर प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली आहे. परंतु पाऊस सुरू झाल्याने औषध फवारणीचा खर्च वाया गेला आहे. पालवी आलेल्या कलमांना मोहोर येण्यासाठी अजून अवधी आहे. पालवी जून होण्यास साधारणत: एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी आंबा पिक लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय एकाचवेळी रत्नागिरी व देवगड हापूस बाजारात दाखल झाल्यास दर गडगडण्याची भिती आहे. हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात अधूनमधून बरसणारा पाऊस हे आंबा हंगामासाठी मोठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असून त्यामुळे पाऊस कधी जाणार? याच्या प्रतिक्षेत बागायतदार असल्याचे दिसून येते. लांबलेला पाऊस हे आंबा हंगाम लांबणीवर जाण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे बागायतदारांनी सांगितले. (प्रतिनिधी)झाडांना आली पालवीबहुतांश हापूसच्या झाडांना पालवी.शेतकरी अद्यापही थंडीच्या प्रतिक्षेत.हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता.अवचित बरसणारा पाऊस ही आंबा हंगामासाठी धोक्याची घंटा?