शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Vidhan Sabha 2019: माणमध्ये शिवसेना-भाजपचा युती धर्माला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:59 IST

संपूर्ण राज्यभर शिवसेना-भाजप युती धर्माला जागून विधानसभा निवडणूक लढणार असली तरीसुद्धा माण मतदारसंघामध्ये या युती धर्माला दोन्ही पक्षांनी हरताळ फासला आहे. या मतदारसंघामध्ये भाजपकडून जयकुमार गोरे तर शिवसेनेकडून शेखर गोरे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत.

ठळक मुद्देमाण विधानसभा मतदारसंघ : शिवसेना-भाजपचा युती धर्माला हरताळभाजपचा जयकुमार गोरे यांना तर शिवसेनेचा शेखर गोरे यांना एबी फॉर्म

सागर गुजरसातारा : संपूर्ण राज्यभर शिवसेना-भाजप युती धर्माला जागून विधानसभा निवडणूक लढणार असली तरीसुद्धा माण मतदारसंघामध्ये या युती धर्माला दोन्ही पक्षांनी हरताळ फासला आहे. या मतदारसंघामध्ये भाजपकडून जयकुमार गोरे तर शिवसेनेकडून शेखर गोरे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत.विशेष म्हणजे गोरे बंधूंना आता भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी एबी फॉर्मही दिला आहे. विधानसभेच्या निवडणूक अर्जासोबत या दोघांचे एबी फॉर्म जोडले गेले आहेत. भाजपने जयकुमार गोरे यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. पक्षातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये माण मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेत प्रवेश केलेले त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरताना सोबत शिवसेनेचा एबी फॉर्म जोडला आहे.साहजिकच संपूर्ण राज्यामध्ये भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समजुतीने जागावाटप झालेले असताना प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांसाठी हे सर्व पक्ष एकत्रितपणे काम करणार आहेत; परंतु माण-खटावमध्ये मात्र मित्रपक्षांमध्ये टक्कर होताना पाहायला मिळणार आहे.माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यांचे राजकारण अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचे आहे. याठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणाने कायमच डोके वर काढलेले पाहायला मिळते. माजी आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्याविरोधात रासपकडून मागील विधानसभा निवडणूक लढलेले शेखर गोरे यांना बाजूला ठेवून सर्वपक्षीय आघाडी एकत्रित आली होती.

गोरे बंधूंचे राजकारण संपवण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप या पक्षांतील नेते उठून बसले होते. आमचं ठरलंय म्हणत या सर्वपक्षीय नेत्यांच्या अनेक बैठकाही विविध ठिकाणी पार पडल्या. साताऱ्यात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमचं ठरलंय आघाडीतर्फे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या नावाची माण मतदारसंघासाठी घोषणा केली.गोरे बंधूंच्या विरोधात एकत्रित आलेल्या या सर्वपक्षीयांची मोट आता बांधण्यात आली आहे. मात्र त्यांचा उमेदवार कोण? हेच निश्चित झालेले नाही. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना केली. त्यानंतर देशमुख यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

रणजितसिंह देशमुख यांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खटावचे माजी सभापती संदीप मांडवे यांना राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली असून, त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गोरेंविरोधात सर्वपक्षीय उमेदवार कोण असेल, हे पाहण्याजोगे आहे.

आम्ही माण मतदारसंघ शिवसेनेसाठी मागितला होता. वरिष्ठ पातळीवरून शेखर गोरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे, त्यामुळे शेखर गोरे यांना शिवसेनेचा एबी फॉर्म दिला आहे.- चंद्रकांत जाधवजिल्हा प्रमुख शिवसेना

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाman-acमानJaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना