शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरला ‘ओडीएफ डबल प्लस’साठी मानांकन

By admin | Updated: August 5, 2016 02:05 IST

नगरपंचायतीचा पुढाकार : नावीन्यपूर्ण योजनांमध्ये एक पाऊल पुढे

मलकापूर : मलकापूरने शहरी विभागात विविध नावीन्यपूर्ण योजना यशस्वी राबवत दि. २ आॅक्टोबर रोजी हगणदारीमुक्त शहर म्हणून वेगळा ठसा उमटविला. याची दखल घेऊन स्वच्छतेत सातत्य राखण्यासाठी शासन स्तरावर ‘ओडीएफ डबल प्लस’साठी मानांकन मिळाले आहे. त्यामुळे नावीन्यपूर्ण योजना यशस्वी करण्यात नगरपंचायतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.येथील नगरपंचायतीने गेली आठ वर्षांत २४ तास पाणी, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, सोलरसीटी यासारखे अनेक नावीन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबवत मलकापूरचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. ग्रामस्वच्छता अभियानातही मागेल त्याला स्वच्छत गृहासाठी अनुदान देऊन शंभर टक्के घरात स्वच्छतागृह उभी केली. उघड्यावर शौचास बसू नये, म्हणून शहरात विविध मार्गाने प्रबोधन केले. यासाठी त्या-त्या प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्याचे फळ म्हणून शासनाच्या विविध पथकाने पाहणी करून दि. २ आॅक्टोंबर २०१५ रोजी मलकापूरला हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित केले. ग्रामस्वच्छता अभियानातील सातत्य राखण्यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर ‘ओडीएफ डबल प्लस’ या विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या सर्व कसोट्या पार करणाऱ्या शहराला विशेष निधी देऊन गौरव करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी काही निवडक शहरांची निवड शासनाने केली आहे. त्या निवडक शहरात मलकापूरचा समावेश झाला असून, ‘ओडीएफ डबल प्लस’ या योजनेसाठी मलकापूर नगरपंचायतीला मानांकन प्राप्त झाले आहे.या योजनेच्या सर्व कसोट्या यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. तसा ठरावही विशेष सभेत करण्यात आला आहे. या शासनाच्या विशेष योजनेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने नावीन्यपूर्ण उपक्रमात मलकापूरने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. (वार्ताहर)चार गुडमॉर्निंग पथके सज्ज मलकापूर शहराचा चार प्रभागांत विस्तार झालेला आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी चार प्रभागांत चार गुडमॉर्निंग पथकांची स्थापना करण्याचा निर्णय झाला. या पथकांमध्ये त्या-त्या प्रभागांतील नगरसेवक, एक अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आहे. आठवड्यातून एकदा कारवाई होणार आहे.शालेय विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षणस्वच्छतेत सातत्य आहे की नाही, यासाठी शहरातील २२ अंगणवाड्या, ११ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ६ विविध संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांतील हजारो मुलांमार्फत सर्वेक्षण फॉर्म भरून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.तीनशे दंड, दीडशे रुपये बक्षीसशहरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यास नगरपंचायतीने ३०० रुपये दंड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. तर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची माहिती नगरपंचायतीला देणाऱ्या नागरिकाला १५० रुपये बक्षीस देण्याची घोषणाही सभेत करण्यात आली.