शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

‘स्मार्ट सिटी’कडे मलकापूरची वाटचाल

By admin | Updated: September 26, 2015 00:15 IST

मोफत वायफायसिटीसाठी निवड : पाणी योजना, सोलरसिटी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प टाऊनप्लॅनिंगनंतर आणखी एक दमदार पाऊल

मलकापूर : आधुनिक तंत्रज्ञान व विविध नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबवून देशपातळीवर पुरस्कारप्राप्त मलकापूरची रिलायन्स कंपनीने दखल घेऊन ‘वायफायसिटी’साठी निवड केली आहे. पाणी योजना, सोलरसिटी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प टाऊनप्लॅनिंगनंतर लवकरच वायफाय सिटीत मलकापूरचा समावेश झाल्याने देशातील निवडक स्मार्टसिटीच्या दृष्टीने यशस्वी वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या सात वर्षांत आधुनिक तंत्रज्ञान आणि मलकापूर हे समीकरणच निर्माण झाले आहे. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेच्या स्वयंचलित यंत्रणेने राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान व अर्बन वॉटर अ‍ॅवार्ड प्राप्त करून देशात पथदर्शी प्रकल्प उभा केला.प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियानांतर्गत १ हजारापेक्षा जास्त मुलींना मोफत बस पास व मुलींची स्वतंत्र बस यशस्वीपणे सुरू करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली. त्याचबरोबर सोलर सिटी योजनेअंतर्गत शहरातील ६३५ घरांवर सोलर उपकरणे बसविली तर दुसऱ्या टप्प्यात २ हजार घरांवर सोलर वॉटर हिटर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मलकापुरात जन्मलेल्या दोनशे पेक्षा जास्त मुलींना प्रियदर्शनी लक्षाधीश कन्यारत्न योजनेंतर्गत लाभ देणारी राज्यातील पहिलीच नगरपंचायत आहे. अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया योजना अशी विविध नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे देशातील १४ निवडक शहरात मलकापूरचा समावेश झालेला आहे. त्यामुळे रिलायन्स उद्योग समुहाचे लक्ष मलकापूरकडे वळले. इंटरनेटमधील सर्वाेच्च सुविधा म्हणून गणना झालेल्या ‘वायफाय’ सिस्टीम सध्या काळाची गरज बनली आहे. कऱ्हाड शहराजवळील मलकापुरात नाविन्यपूर्ण योजना यशस्वी होतात. हे ओळखून रिलायन्स कंपनीने मलकापूरची वायफाय सिटी साठी निवड केली आहे. काही दिवसांत कंपनीद्वारे मलकापूर शहरात प्रत्यक्ष कामालाही सुरूवात होणार आहे. त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शहरात काम करण्यासाठी परवानगी देण्याचा ठरावही नगरपंचायतीने मंगळवारी झालेल्या सभेत करण्यात आला आहे. अशा अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या निवडक शहरांमध्ये मलकापूरचा समावेश झाल्यामुळे शहराची आपोआपच स्मार्ट सिटीकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. राज्यात इस्लामपूरनंतर रिलायन्स उद्योगसमूहाने निवडलेले सातारा जिल्ह्यातील मलकापूर हे दुसरे शहर ठरले आहे. त्यामुळे आता मलकापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा उभा राहणार आहे. (प्रतिनिधी) कृष्णा उद्योगसमूहास फायदा मलकापूर शहरात उच्च शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेले कृष्णा वैद्यकीय संशोधन केंद्र व कृष्णा अभिमत विद्यापीठांतर्गत विविध पदवी व उच्च पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात. हजारो कर्मचारी व विद्यार्थी इंटरनेटचा वापर करतात. संपूर्ण शहरच ‘वायफाय’ने जोडल्यास सर्वात जास्त फायदा हा कृष्णा उद्योगसमुहाला होणार आहे. मलकापुरातील नागरिकांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोक सुशिक्षित आहेत. ३६ हजार लोकसंख्येपैकी २० हजारांपेक्षा जास्त लोक मोबाइलचा वापर करतात. मोबाइलवर वॉट्सअप व फेसबुकसाठी व इतर माहिती मिळण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. मलकापूर वायफाय सिटी झाल्याच याचा नक्कीच फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना फायदाकृष्णा अभिमत विद्यापीठांतर्गत विविध शैक्षणिक संकुलांबरोबरच शहरात दोन महाविद्यालये, ११ माध्यमिक शाळा तर १२ प्राथमिक शाळांमध्ये संगणक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. बँका, डॉक्टर व अधिकाऱ्यांना फायदा मलकापूरात प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, सहकारी बँका व पतसंस्थेचे मोठे जाळे आहे. सध्या बहुतांशी संस्थांमधून नेट बँकींग सुरु आहे. वायफाय सिटीचा त्यांना चांगलाच फायदा होणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर, शासकीय अधिकारी यांनाही सुविधा मिळणार आहेत.उद्योगपतींना सुलभ सुविधा कोयना औद्योगिक वसाहतींमध्ये लहान मोठे ३६ उद्योग उभे आहेत. त्याचबरोबर शहरात दोन हजारांपेक्षा जास्त व्यवसायीक व्यावसाय करतात. त्यापैकी काही उद्योगांना राज्यात परराज्यात तर काहींना परदेशी ग्राहकांशी संवाद साधावा लागतो. सध्या सर्वात जास्त संवाद हा इंटरनेटद्वारे केला जातो. त्यासाठी मलकापूरची ‘वायफाय’ सिटी झाल्यास अशा उद्योगपतींना सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहे.