शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात ‘मुदतपूर्व’ची शक्यता !

By admin | Updated: April 21, 2017 22:24 IST

हालचाली गतिमान : नगरपरिषद करण्यासाठी अतुल भोसलेंचा पाठपुरावा

कऱ्हाड : मलकापूर नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे यासाठी भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यासाठीची मागणी लावून धरली आहे. मंत्रालय पातळीवर याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या असून, लवकरच नगरपंचायतीला नगरपरिषदेचा आकार येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे मलकापुरात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यताही वर्तविली जात आहे. कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेल्या कऱ्हाडचं उपनगर म्हणून मलकापूरची ओळख निर्माण झाली आहे. खरंतर मलकापूर हा मूळचा कऱ्हाडचाच एक भाग आहे. पण १९६२ मध्ये मलकापूर ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून आकाराला आली. त्यावेळी ज्ञानदेव कराळे यांनी परिश्रम घेतल्याचे सांगितले जाते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिकदृष्ट्या कऱ्हाडचे महत्त्व वाढीस लागले आणि कऱ्हाडच्या दोन्ही बाजूंनी नदी असल्याने त्याच्या विस्ताराला मर्यादा पडल्या. साहजिकच याचा परिणाम म्हणून कऱ्हाडची उपनगरे वाढू लागली. त्याला मलकापूर अपवाद नाही. पुणे-बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला मलकापूर वाढू लागले. लोकसंख्या वाढू लागल्याने गावाचा विकास त्याच पद्धतीने अपेक्षित होता. ग्रामपंचायत असल्याने विकासनिधीला मर्यादा पडत होत्या. म्हणून मनोहर शिंदे यांच्या प्रयत्नातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापुरात ग्रामपंचायत सदस्य ‘मेहरबान’ झाले. कारण मलकापूरची २००८ मध्ये नगरपंचायत झाली. कऱ्हाडजवळचे महामार्गालगत वसलेले उपनगर म्हणून मलकापूरची वाढ तितक्याच झपाट्याने होत आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विकास दर वाढण्यासाठी आता नगरपंचायतीची नगरपरिषद होणे गरजेचे बनले आहे. हीच गरज ओळखून भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपरिषदेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच केली होती. मलकापूर नगरपंचायतीची सन २०११ ची लोकसंख्या २७ हजार इतकी आहे. आता तर त्यापेक्षा जास्त लोकसंख्या झाली आहे. नगरपंचायतीची नगरपरिषद होण्यासाठी जे काही निकष आहेत त्यात मलकापूर बसत आहे. त्या सगळ्याचा पाठपुरावा डॉ. अतुल भोसलेंनी जोरदार चालविला आहे. मंत्रालय पातळीवरही याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय त्वरित घेतल्यास मलकापुरात मुदतपूर्व निवडणूक झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मलकापूर नगरपंचायतीची गत निवडणूक आॅगस्ट २०१३ मध्ये झाली होती. त्यामुळे पुढील निवडणुकीसाठी अजून सुमारे दीड वर्षाचा अवधी आहे. (प्रतिनिधी)