शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:36 IST

काहींना आता खूप वेळ आहे. त्यांना काम नाही आणि त्यांच्याकडे सध्या काही करण्यासारखेही नाही. काहींना काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्याच्यापलीकडे यात फार काही वेगळे नाही. ते प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

ठळक मुद्देदुर्लक्षित फडणवीस-पडळकरांचा प्रसिद्धीसाठी स्टंट : शरद पवार राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचे स्पष्टीकरण

सातारा : काहींना आता खूप वेळ आहे. त्यांना काम नाही आणि त्यांच्याकडे सध्या काही करण्यासारखेही नाही. काहींना काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्याच्यापलीकडे यात फार काही वेगळे नाही. ते प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीनंतर येथील विश्रामगृहावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, मला माहीत आहे की, माझ्या विरोधात लोकसभा लढवली तिथे अनामत जप्त झाली. बारामती विधानसभा लढवली तिथे अनामत जप्त झाली. सांगली लोकसभा लढवली आणि तिथेही अनामत जप्त झाली, असे माझ्या वाचनात आले. जे बारामतीत पडले, सांगलीत पडले आणि अशा लोकांना समाजाने ज्या-त्यावेळी बाजूला केले. त्या लोकांची आपण नोंद तरी कशाला ठेवायची.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा उल्लेख इनसायडरला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यात त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेच्या अनुषंगाने टीका केली होती. त्याचा संदर्भ देऊन शरद पवार यांना विचारले असता त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या टीकेला कोणताही आधार नाही.

ते म्हणाले, गोपीचंद पडळकर यांच्या त्या टीकेला फार काही महत्त्व द्यावे आणि त्याला उत्तर द्यावे, असे वाटत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही काम राहिलेले नाही, ते दुर्लक्षित आहेत. माझ्यावर टीका करून ते प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत.सतत होत असलेल्या इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बोलताना खासदार पवार म्हणाले, पेट्रोल, डिझेल या इंधनांची रोज दरवाढ होत आहे. इतिहासात असं कधी पाहिलं नाही. देश संकटात आहे. असे असतानाही केंद्र सरकार आवश्यक वस्तू महाग करत आहे. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होतो आहे. लॉकडाऊनमुळे लोक गप्प आहेत. लोक सहन करतात म्हणून केंद्रशासन गैरफायदा घेत आहे.गलवान येथील सीमावर्ती भागात घुसखोरी करत असताना केंद्र सरकार कमी पडत आहे काय? या प्रश्नावर बोलताना खासदार पवार म्हणाले, ह्यगलवान परिसरात भारत रस्ता तयार करतोय. सियाचीन भागातील दळण-वळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर चीनचे सैन्य घुसखोरी करत आहे. अशा घटना वारंवार घडतात; परंतु १९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना या परिसरात दोन्ही सैन्यांनी शस्त्राचा वापर करायचा नाही, असा करार केला होता.सध्याच्या परिस्थितीत देखील कुठेही दोन्ही देशांच्या सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेले नाही. हानामारीचे प्रकार घडले. यामध्येच केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचं अपयश आहे, असे म्हणता येणार नाही. तो आरोपही अयोग्य ठरेल. चिनने १९६२ नंतर भारताचा ३६ हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला, हे सत्य आहे आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आलेलं दिसतंय, त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असं मला वाटतं."कोरोनाच्या लॉकडाऊननमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्रात विविध उद्योगांत काम करणारे परराज्यातील मजूर त्यांच्या मनामध्ये कोरोनाविषयीची भीती निर्माण झाली होती. विशेषत: मुंबईत कोरोना वाढत असल्याने ही भीती अधिक बळावलेली होती.

लोकांच्या मनातील भीती जावी लोकांना कोरोनासोबत जगायचे आहे, याचा विश्वास निर्माण व्हावा, यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. महाराष्ट्रातील माध्यमे फारच जागृत असल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद कोरोनाची परिस्थिती अधिक ठळकपणे आली. यातूनच लोकांनी भीती घेतली असल्याचा चिमटादेखील खासदार पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांना काढला.नागरी सहकारी बँका व मल्टिस्टेट बँका यांच्यावर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण आणण्याचा केंद्रशासन केंद्र शासनाने घेतलेला निर्णय हा सहकार चळवळीसाठी बाधक ठरू शकतो. सहकार चळवळ संकुचित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील खासदार पवार यांनी केला. तसेच शेती क्षेत्रातील अभ्यास असणारे राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर घेणे माझी जबाबदारी होती, ती मी पूर्ण केली आहे, असं स्पष्टीकरणही खा. पवार यांनी एका प्रश्नाबाबत केले.

 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसर