शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्राचा पर्यटन विकास आराखडा नव्याने तयार करणार - मंत्री शंभूराज देसाई 

By प्रमोद सुकरे | Updated: December 23, 2024 18:08 IST

जागतिक पर्यटन तज्ञांची मदत घेणार

कराड : महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. त्यामुळे जागतिक पर्यटन तज्ञांची मदत घेऊन महाराष्ट्राचा नव्याने पर्यटन विकास आराखडा तयार करणार आहे. त्या आराखड्यानुसार महाराष्ट्राला पर्यटनात देशात एक नंबर राज्य करण्याचा आपला मानस आहे असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कराड येथे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, मंत्रीपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात आज प्रथम येत आहे. होणारे उत्स्फूर्त स्वागत हे महायुतीवरील प्रेम मतदार व्यक्त करीत आहेत असे मला वाटते. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मला मंत्रिपदाची संधी दिली आहे. माझ्याकडे पर्यटन, खाणीकर्म, माजी सैनिक कल्याण याचा पदभार असून या सगळ्या विभागांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

मंगळवारी 'मिलिटरी अपशिंगे'ला जाणार सातारा जिल्हा हा माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे या गावात प्रत्येक घरटी एकादा दुसरा माणूस सैन्य दलात काम करतो. त्यामुळे उद्या मंगळवारी दि.२४ रोजी मी अधिकाऱ्यांसमवेत मिलिटरी अपशिंगे गावाला भेट देणार असून त्या गावाच्या विकासासाठी वेगळे काय करता येईल याचा आराखडा तयार करणार असल्याचे मंत्री देसाईंनी यावेळी सांगितले. 

प्रतापगडच्या विकासाचा दुसरा टप्पा मार्गी लावणार सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा ऐतिहासिक गड आहे. गड संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्रतापगड चा आराखडा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच तयार केला आहे. त्याला काही प्रमाणात निधी दिला आहे. त्याचा दुसरा टप्पा मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून बुधवारी (दि २५) पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रतापगडची पाहणी करणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनShambhuraj Desaiशंभूराज देसाई