शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: महाराणी ताराराणी यांची समाधी अजूनही दुर्लक्षित, जीर्णोद्धारासाठी ठोस पावले उचलण्याची गरज

By सचिन काकडे | Updated: April 20, 2023 18:04 IST

एक स्त्री असूनही त्या काळात त्यांनी औरंगजेब आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले होते.

सातारा : साताऱ्यातील संगममाहुली येथे असणाऱ्या महाराणी येसूबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या हालचाली गतिमान झाल्या असताना आता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा विषयही चर्चेत आला आहे. पुरातत्व विभागाने या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे.करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा तर राजाराम महाराजांच्या पत्नी त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पराक्रम केले. एक स्त्री असूनही त्या काळात त्यांनी औरंगजेब आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर त्यांचे काही काळ वास्तव्य होते. किल्ल्यावर १७६१ रोजी देहावसान झाल्यानंतर त्यांची संगममाहुली येथे कृष्णा नदी काठावर समाधी बांधण्यात आली. साताऱ्यातील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेने दिवंगत शिवाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ रोजी या समाधीचा शोध घेतला होता.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा इतिहास अभ्यासकांनी शोध लावला. सुस्थितीत असलेल्या या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी साताऱ्याच्या लोकप्रतिनिधींनीही एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, संगममाहुलीत कित्येक वर्षांपासून जीर्णाेद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराणी ताराराणींच्या समाधीकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले ना पुरातत्व विभागाचे. इतिहासाच्या या पाऊलखुणांचे संवर्धन करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

ही तर सातारकरांची जबाबदारी..साताऱ्यातील संगममाहुली हे एक धार्मिक क्षेत्र असून, येथील पुरातन मंदिरे आजही इतिहासाची साक्ष देतात. मात्र, आजमितीला हे सांस्कृतिक वैभव निस्तेज होऊ लागलेय, ते केवळ आपल्या अनास्थेपायी. या घाटावर राजघराण्यातील अनेक सदस्यांच्या समाधी असून, इतिहास अभ्यासकांमुळे त्या हळूहळू प्रकाशझोतात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाची जपणूक करणे, ही सातारकरांचीच जबाबदारी आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच संगममाहुलीतील महाराणी येसूबाई यांच्या समाधीची पाहणी केली. यावेळी घाटावर असलेल्या राजघराण्यातील अन्य सदस्यांच्या समाधीची त्यांनी माहिती दिली. या समाधीस्थळांच्या संवर्धनासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील. - सुहास राजेशिर्के, संस्थापक, महाराणी येसूबाई फाउंडेशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसर