शेंद्रे : सातारा तालुक्यातील कुसवडे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महादेव ज्योती यादव यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची निवडीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ही निवड केली. नवनियुक्त अध्यक्ष महादेव यादव यांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील तंटे हे गावातच मिटविण्याचा प्रयत्न तंटामुक्त समितीच्या माध्यमातून करण्यात यावा. गावातील सर्व लोकांना विश्वासात घेऊन तंटामुक्त समितीने आदर्श असे कामकाज करावे. यासाठी लागणारे प्रशासनाचे व माझे योग्य ते सहकार्य तंटामुक्त समिती, कुसवडेसाठी राहील. तसेच यावेळी नवनियुक्त अध्यक्ष महादेव यादव यांनी सर्वांना विश्वासात घेऊन तंटामुक्त समिती एक आदर्शवत कामकाज करून कुसावडे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करील.’
यावेळी सातारा बाजार समितीचे सभापती ॲड. विक्रम पवार, सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, राजेंद्र यादव, अमर मोरे, अविनाश पवार, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रामचंद्र जगताप, रामचंद्र यादव, योगेश पवार, संदीप निकम, अमोल बल्लाळ उपस्थित होते.
फोटो : ३१शेंद्रे
कुसवडे येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महादेव यादव यांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती ॲड. विक्रम पवार, अरविंद चव्हाण उपस्थित होते. (छाया : सागर नावडकर)