शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरचे हॉटेल सील; साता-याचे अधिकारी मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:53 IST

सातारा : लग्नाच्या वरातीमध्ये डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी महाबळेश्वरमधील ‘हॉटेल किज’ला सील ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात सातारा जिल्ह्यातील अधिका-यांची टीम दाखल झाली.

सातारा : लग्नाच्या वरातीमध्ये डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी महाबळेश्वरमधील ‘हॉटेल किज’ला सील ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात सातारा जिल्ह्यातील अधिका-यांची टीम दाखल झाली. हॉटेलच्या जल प्रदूषणासह इतर अनेक बाबींची मंगळवारी बैठकीत चर्चा झाली.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबीयांसह महाबळेश्वरमध्ये मुक्कामी असताना ‘हॉटेल किज’मध्ये लग्नाच्या वरातीत डीजे वाजविला म्हणून ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर अधिवेशनात चर्चाही झाली. त्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या आदेशानुसार महाबळेश्वरमधील सर्वात मोठ्या हॉटेलचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. विद्युत पुरवठा खंडित करून हॉटेलला सील ठोकण्यात आले.मंगळवारी अतिरिक्त जिल्हा अधिकारी साहेबराव गायकवाड यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाबळेश्वर नगरपालिकेच्या अधिकाºयांची बैठक कदम यांच्या दालनात झाली. हॉटेलमध्ये जल प्रदूषणही मोठ्या प्रमाणात झाल्याचा अहवाल अधिकाºयांनी सादर केल्यानंतर पुढील कारवाईबाबतची चर्चा झाली.ध्वनी प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दालनात पाचारण करण्यात आले होते. महाबळेश्वरमधील इतर हॉटेल्समध्येही यापुढे गोंधळ घातला जाऊ नये, याचीही चर्चा झाली. बुधवारी पोलिसांनी महाबळेश्वरमधील हॉटेल चालकांची तातडीने बैठक बोलाविली आहे.या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती़ उद्धव यांना त्रास होतो म्हणून हॉटेलवर कारवाई केली जाते़ मग सर्वसामान्यांना त्रास होत असताना कारवाई का होत नाही, असा आरोपही काहींनी केला़प्रदुषण मंडळाने तत्पर होऊन याप्रकरणी तात्काळ कारवाई केली़ इतर ठिकाणीही ध्वनी प्रदुषण झाल्यास मंडळाने कोणाचीही हयगय न करता कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली़