शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

महाबळेश्वरला आता मधुचंद्राबरोबरच ‘मधु’पर्यटनही! देशातील पहिले मधाचे गाव जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 07:43 IST

मांघरमध्ये मधुपर्यटन सुरू व्हावे, यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या काही वर्षांपासून झटत आहे.

- सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘महाराष्ट्राचे काश्मीर’ असा नावलौकिक असणाऱ्या महाबळेश्वरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तेथील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून राज्य सरकारने निवडले आहे. देशातील हे पहिलेच ‘मधाचे गाव’ ठरणार आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये मधुचंद्रही आणि मधुपर्यटनही असा दुग्धशर्करा योग साधण्याची संधी नवथर जोडप्यांना मिळणार आहे. इतर पर्यटकांना स्ट्रॉबेरीबरोबरच एक मधाचे बोट चाखायला मिळेल.

 मांघरमध्ये मधुपर्यटन सुरू व्हावे, यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या काही वर्षांपासून झटत आहे. या परिसराचा झालेला विकास पाहून विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी मधाचे गाव ही संकल्पना मांडली. आता ती प्रत्यक्षात साकारत आहे. याबाबतची घोषणा लवकरच उद्योगमंत्री सुभाष देसाई करणार आहेत. मधाचे गाव ही संकल्पना केवळ मांघरपर्यंत सीमित नसून ती राज्यातील इतर जिल्ह्यांत राबविली जाणार आहे. 

  असे आहे मांघर...मांघर हे गाव महाबळेश्वरपासून ८ किलाेमीटर कड्याखाली वसले आहे. गावची लाेकसंख्या ४५० आहे. ८० टक्के लोक मधमाश्यापालन करतात. या गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल असून, वर्षभर राहणारा फुलोरा आहे. गावाने आज अखेर शासनाचे जवळपास दहा पुरस्कार मिळवले आहेत. गावात मधमाश्यांमुळे समृद्धी आली आहे. गावात सामूहिक मधमाश्यांचे संगोपन केले जात आहे.

मध संचालनालयn मधमाश्यांचा विकास व विस्तार व्हावा, या उद्देशाने १९५७ साली मध संचालनालयाची स्थापना महाबळेश्वरला करण्यात आली आहे. n मधमाश्यांची संख्या वाढावी, तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, जंगल व डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधुपर्यटन ही संकल्पना रुजावी, यासाठी संचालनालय झटत आहे

मधाचे गाव संकल्पना केवळ मांघरपर्यत सिमीत नसून इतर जिल्ह्यात राबविली जाणार आहे. मधमाश्यांच्या परपरागीकरणामुळे शेतीपीक उत्पादनात वाढ होते, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. - बिपिन जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान