शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

महाबळेश्वर गारठले; पारा १५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:40 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याचा पारा खालावू लागला असून, महाबळेश्वरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. रविवारी महाबळेश्वरचे किमान तापमान ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याचा पारा खालावू लागला असून, महाबळेश्वरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. रविवारी महाबळेश्वरचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. गेल्या वर्षी १२ डिसेंबरला याठिकाणी दवबिंदू गोठल्याने हिमकण पाहावयास मिळाले होते. यंदा तापमानात सतत बदल होत असल्याने पर्यटकांना हिमकण पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.सातारा शहराच्या वातावरणात रविवारी अचानक बदल झाला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने सायंकाळी थंडीची तीव्रता अधिक जाणवली. रविवारी शहराचे कमाल तापमान ३०, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. थंडीत वाढ होऊ लागल्याने शहरी तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या असून, उबदार कपड्यांनाही मागणी वाढू लागली आहे.थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पाराही हळूहळू खालावू लागला आहे. तालुक्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान गुरुवारी (दि. १९) १३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. रविवारीही १५ अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला. तापमान तीन ते चार अंशांवर येताच वेण्णा जलाशय, लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. गेल्या वर्षी १२ डिसेंबरला दवबिंदू गोठल्याने सर्वत्र पांढऱ्या शुभ्र हिमकणांची चादर पसरली होती. यंदा तापमानात सतत चढ-उतार होत असल्याने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हिमकणांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सध्या येथील गुलाबी थंडीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.महाबळेश्वरचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)दिनांक कमाल किमान१८ डिसेंबर २४.४ १३.७१९ डिसेंबर २५ १३.४२० डिसेंबर २५.२ १३.८२१ डिसेंबर २४ १५.८२२ डिसेंबर २३.३ १५प्राण्यांना पोत्याचे स्वेटरसध्या थंडीचा कडाका वाढत चालला आहे. रात्रीच्या वेळी व पहाटे थंडीचे प्रमाण जास्त आहे. थंडीपासून बचावासाठी लोकं स्वेटर, कानटोप्या, स्कार्फ तसेच झोपताना गरम ब्लँकेट्सचा वापर करतात. परंतु पक्षी, प्राणी थंडीपासून आपला बचाव कसा करत असतील! आपल्या जनावरांच्या गोठ्यात लहानसं रेडकू थंडीने कुडकुडत असलेले साहिल गोरे या विद्यार्थ्याने पाहिले व त्याने स्वकल्पनेतून रेडकासाठी चक्क पोत्याचे स्वेटर बनविले आहे.