शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेची लाट असतानाच महाबळेश्वर धुक्यात हरवले; पर्यटक भारावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 17:26 IST

वातावरणातील बदलामुळे शहरात सकाळी व सायंकाळी धुक्याची दुलई पसरत असून, पर्यटक या आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

महाबळेश्वर : राज्यात एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात निसर्गाचा अनोखा आविष्कार पर्यटकांना अनुभवयास मिळत आहे. वातावरणातील बदलामुळे शहरात सकाळी व सायंकाळी धुक्याची दुलई पसरत असून, पर्यटक या आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.महाबळेश्वरचा निसर्ग पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करीत असतो. या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या पर्यटननगरीला भेट देत असतात. पर्यटकांचा उन्हाळी हंगाम नुकताच सुरू झाल्याने महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेले आहे. हे पर्यटक सध्या धुक्याचा आनंद घेऊ लागले आहेत.गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. मात्र, महाबळेश्वर याला अपवाद ठरू पाहत आहे. येथील वातावरण सातत्याने बदलत आहे. थंडीबरोबरच सकाळी व सायंकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेले हे वातावरण पाहून पर्यटकही भारावून जात आहेत. सायंकाळी वेण्णा जलाशयात नौकाविहार करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे तर रात्री मुख्य बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप येत आहे.वाहतूक कोंडीची समस्या कायमपर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने महाबळेश्वरात दररोज महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, दिल्ली या राज्यातील पर्यटक हजेरी लावत आहेत. मात्र, अद्यापही पालिका व पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे वेण्णा जलाशय ते महाबळेश्वर, महाडनाका रोड, मुख्य बाजारपेठ तसेच ब्रिटिशकालीन पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान