शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाबळेश्वर बनतंय संशोधनाचं हब!, शेतकऱ्यांसाठी पर्वणी; गहू अन् ढगांनंतर होणार स्ट्रॉबेरीवर संशोधन

By सचिन काकडे | Updated: March 31, 2023 14:07 IST

महाबळेश्वर हे केवळ पर्यटनस्थळच नव्हे तर अलीकडे संशोधन केंद्र म्हणूनही नावारूपास येऊ लागले

सचिन काकडेसातारा : महाबळेश्वर हे केवळ पर्यटनस्थळच नव्हे तर अलीकडे संशोधन केंद्र म्हणूनही नावारूपास येऊ लागले आहे. गहू गेरवा व ढग संशोधन केंद्रानंतर याठिकाणी स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभे राहत असून, शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक्षम स्ट्रॉबेरी रोपांची लागवड करता येणार आहे.स्ट्रॉबेरीवर ग्रेमोल्ड, फूलकीडे, माइट, रेड स्टील, बोटरॅसिस अशा प्रकारचे रोग येतात तर ॲनफ्रेक नोझ ही बुरशीदेखील पडते. याचा मोठा फटका स्ट्रॉबेरीला बसतो. अशा रोगांपासून हे पीक वाचावे, यासाठी महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू व्हावे, अशी शेतकऱ्यांनी मागणी होती. दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राहुरी कृषी विद्यापीठाने या संशोधन केंद्राला हिरवा कंदिल दाखविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाबळेश्वरच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारून स्ट्रॉबेरीवर पडणाऱ्या विविध रोगांचे संशोधन होणार असून, येत्या काही दिवसांत प्रयोगशाळेचे काम सुरू होणार आहे. या केंद्रासाठी शासनाने तीन कोटी ४३ लाखांचा निधीही मंजूर केला आहे.

स्ट्रॉबेरीवर असे होणार संशोधनमहाबळेश्वरचे वातावरण स्ट्रॉबेरीला पोषक असले तरी बुरशीनाशक, कीटकशानक तसेच जमिनीतून तयार होणाऱ्या रोगराईचा या पिकाला दरवर्षी फटका बसतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनातही घट होते. अशा सर्व प्रकारच्या रोगांचे तसेच येथील माती, पाणी आणि रोपांचे प्रयोगशाळेत संशोधन होणार असून, शेतकऱ्यांना रोगास प्रतिकारक्षम असलेल्या रोपांची लागवड करता येणार आहे.विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रमहाबळेश्वरचे वातावरण गव्हावर पडणाऱ्या तांबेरा रोगावरील संशोधन करण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे या ठिकाणी १८ मार्च १९४१ रोजी गहू गेरवा संशोधन केंद्राची स्थापणा करण्यात आली. दरवर्षी भारतातून सुमारे चार हजार गव्हाचे वाण काळा व नारंगी तांबेरा प्रतिबंध चाचणीसाठी संशोधन केंद्रात येतात.

ढग संशोधक केंद्रभारत सरकारच्या मान्सून मिशन कार्यक्रमांतर्गत महाबळेश्वरात ढग संशोधन केंद्र साकारण्यात आले. महाबळेश्वरमध्ये ढग जमिनीवर असतात. त्यामुळे येथे ढगांचे निरीक्षण व अभ्यास करणे सोपे झाले आहे. तापमान, आर्द्रता, बाष्पिभवन, रेडिएशन आदींचा अभ्यास प्रयोगशाळेत केला जातो. सुमारे ३५ किलोमीटर परिसरातील ढगांचे विश्लेषण या संशोधन केंद्रात केले जाते.

गहू गेरवा संशोधन केंद्रात गव्हावर संशोधन केले जाते, त्याप्रमाणे स्थानिक पीक म्हणून स्ट्रॉबेरीवरही संशोधन व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, संशोधन केंद्राला मंजुरी मिळाली आहे. हे केंद्र शेतकऱ्यांसाठी नक्कीच फलदायी ठरेल. - किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी- विक्री संस्था

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी : २,०००दरवर्षी उत्पादन : ४० हजार मेट्रिक टनदेशातील एकूण उत्पादनाचा वाटा : ८५ टक्के

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानResearchसंशोधन