शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर हाऊसफुल्ल : तीन दिवसांत ४५ हजार पर्यटक , देशभरातील पर्यटकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:54 IST

महाबळेश्वर : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांची रेलचेल सुरूच आहे. सलग सुट्यांमुळे तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल ४५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली.

ठळक मुद्दे; कोट्यवधींची उलाढाल

महाबळेश्वर : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांची रेलचेल सुरूच आहे. सलग सुट्यांमुळे तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल ४५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली. जिल्'ात एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना महाबळेश्वरच्या थंड व आल्हाददायी वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.पर्यटन हा महाबळेश्वर व पाचगणीच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. शनिवार, रविवार, बुद्ध पौर्णिमा व कामगार दिनानिमित्त सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल ४५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वर, पाचगणीला भेट दिली आहे.महाबळेश्वरात असलेले केट्स, लॉडविक, आर्थरसीट, बॅबिग्टन, एल्फिस्टन, विल्सन आदी ब्रिटिशकालीन पॉर्इंट पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. हे पॉर्इंट पर्यटकांच्या गर्दीने दिवसभर गजबजून जात आहेत. तर नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा तलावावर पर्यटकांची सायंकाळी नौकाविहार करण्यासाठी झुंबड उडत आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाºया तापोळ्याला पर्यटक भेटी देत असून, येथील शिवसागर जलाशयातही नौकाविहार करीत आहेत.व्यावसायिकांना अच्छे दिनसुट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे. अनेक पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल उपलब्ध होत नसल्याने पर्यटक पाचगणी व वाई येथे मुक्काम करीत आहे. पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिक, व्यापारी व स्थानिक नागरिकांना अच्छे दिन आले आहेत. गेल्या तीन दिवसांतच महाबळेश्वरात खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय