शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर गारठले; साताऱ्याचा पारा १२ अंशावर

By नितीन काळेल | Updated: January 18, 2024 19:21 IST

सातारा : जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपासून शीतलहर असून पारा खालावला आहे. सातारा शहरात तर १२ अंशापर्यंत किमान तापमान आले ...

सातारा : जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपासून शीतलहर असून पारा खालावला आहे. सातारा शहरात तर १२ अंशापर्यंत किमान तापमान आले आहे. तर महाबळेश्वरही गारठले असून हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागत असून जनजीवनावरही परिणाम होऊ लागला आहे.जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरूवात होते. मात्र, यावर्षी थंडीला उशिरा सुरूवात झाली. संपूर्ण नोव्हेंबर महिना थंडीविना गेला. कारण, कायम किमान तापमान २० अंशापर्यंत होते. डिसेंबर महिना उजाडलातरी थंडी कमी होते. पण, डिसेंबरच्या मध्यानंतर थंडी जाणवू लागली. त्यावेळी १३ अंशापर्यंत खाली जिल्ह्याचा पारा आला होता. महाबळेश्वरलाही १२ अंशापर्यंत तापमान घसरले होते. पण, दोन दिवसांतच पारा वाढत गेला. त्यामुळे थंडीही गायब झाली होती. परिणामी यंदा कडाक्याची थंडी पडणार नाही असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, देशाच्या उत्तर भागात सध्या बर्फ पडत आहे. तसेच जम्मू, दिल्ली, पंजाबात पारा घसरल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. तसाच प्रकार सातारा जिल्ह्यातही सुरू झाला आहे. पाच दिवसांपासून वातावरणात शीतलहर असल्याने अंगातून थंडी जाईना अशी स्थिती आहे. त्यामुळे एकप्रकारे थंडीची लाटच आल्याचे चित्र आहे.सातारा शहरात तर गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान १५ अंशाखाली आहे. गुरुवारी १२ अंश पारा नोंद झाला. तर महाबळेश्वचा पाराही ११.९ अंश नोंद झाला. शीतलहर आणि पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. सकाळच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. तर शेतीच्या कामावर अधिक परिणाम झाला आहे. शेतकरी सकाळी दहानंतरच शेतातील कामे उरकत आहेत. तर शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागही गारठला आहे. तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे तर गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीशी नागरिक तसेच पर्यटकांना सामना करावा लागतोय. आणखी काही दिवस कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज आहे.

सातारा शहरात नोंद किमान तापमान..दि. १ जानेवारी १३.७, २ जानेवारी १४.१, ३ जानेवारी १५.४, ४ जानेवारी १६.५, ५ जानेवारी १७.२. ६ जानेवारी १७.५, ७ जानेवारी १७.२. दि. ८ जानेवारी १६.६, ९ जानेवारी २०.२, १० जानेवारी १८.१, दि. ११ जानेवारी १७.४, १२ जानेवारी १६.१, १३ जानेवारी १५.५, १४ जानेवारी १५.८, दि. १५ जानेवारी १४.५, १६ जानेवारी १२.४, १७ जानेवारी १३, १८ जानेवारी १२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान