शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सलग ५५ वर्षे ‘मेंबर’ असलेल्या माधवराव निगडेंची अखेर दखल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:10 IST

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बारावेळा निवडून येऊन ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्द करत आहे. अशाप्रकारे पंचायतराज व्यवस्थेत राष्ट्रीय विक्रम केल्याने त्याची ...

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बारावेळा निवडून येऊन ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्द करत आहे. अशाप्रकारे पंचायतराज व्यवस्थेत राष्ट्रीय विक्रम केल्याने त्याची लिम्का बुकला दखल घ्यावी लागली आहे.सातारा जिल्ह्याचे सुपूत्र असलेले खासदार शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीची तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि विधिमंडळ अशी राजकीय कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. दुसरीकडे आसले ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत सलग ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे.ग्रामपंचायत सदस्य होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा सहकारी बोर्डात जिल्हास्तरावर सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी ते पहिल्यांदा १९६२ मध्ये आसले ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर गावचे पहिले सरपंच म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी सलग दहा वर्षे सरपंच व नंतर आरक्षणामुळे दोन पंचवार्षिक कार्यकाळात उपसरपंच म्हणून काम केले आहे.त्यांच्या कारकिर्दीत गावातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, कृषी क्षेत्रात अनेक विकासकामे केली. गावाला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते निवडून आले असून, सध्या ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असून, त्यांची मुदत २०२० पर्यंत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांचाउत्साह आणि काम करण्याचीतयारी पाहून आजही गावच्या तरुणांना त्यांचा हेवा वाटत असतो. त्यांच्या या कामाची लिम्का बुकने २०१२ मध्ये देशातील ग्रामपंचायतींमध्ये सर्वात मोठी आणि सलग कारकिर्द केल्याची नोंद घेतली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून त्यांच्या कामाची दखल घ्यावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.शासन दप्तरी नोंदीअभावी वंचितअनेक वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणाºया माधवराव निगडेंच्या विक्रमाची शासनपातळीवर कुठेही नोंद नाही. काही वर्षांपूर्वी पंचायत राज संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. त्यावेळी ज्यांनी २५ वर्षे किंवा जास्त वर्षे कारकिर्द पूर्ण केलेल्या लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सातारा जिल्हा प्रशासनास जिल्ह्यात असा कोण व्यक्ती आहे, हेच माहिती नव्हते.सहकारी चळवळीतही योगदानग्रामपंचातीत काम करत असताना वाई तालुक्यातील सहकारी संस्था उभारण्यात योगदान दिले आहे. किसन वीर सहकारी साखर कारखाना, वाई तालुका सूतगिरणी स्थापनेपासून शेअर गोळा करण्यापासून उभारणीपर्यंत सभासद म्हणून काम करत आहेत.