शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

माढा मतदारसंघ : उत्तम जानकरांचं चाललंय काय? नागपुरात फडणवीस भेट, पुण्यात पवारांशी चर्चा

By नितीन काळेल | Updated: April 17, 2024 22:51 IST

भेटीत शरद पवार म्हणाले एकत्र या; मोहितेंबरोबर जाण्याचाही विचार

सातारा : माढा मतदारसंघात राजकीय वातावरण हेलकावे खात असून नागपुरातील फडणवीस भेटीनंतर उत्तम जानकर यांनी बुधवारी सकाळीच धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पवार यांनीही दोघांना एकत्र या, असा संदेश दिला. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधकांत मनोमिलन झाल्याचे संकेत आहेत; पण, जानकर यांची भूमिका शेवटी काय राहणार याचा अंदाज बांधणे अवघड झालेले आहे.माढ्याच्या मागील निवडणुकीत उत्तम जानकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी काम केले. तसेच मोहिते-पाटीलही खासदारांबरोबर होते. राजकीय वितुष्टातून मोहिते-पाटील यांनी भाजपला सोडले. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाऊन माढा लोकसभेची उमदेवारीही धैर्यशील मोहिते यांनी मिळवली.निवडणुकीसाठीच त्यांनी मतदारसंघातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीही वाढवल्या. त्यातूनच उत्तम जानकर यांच्याबरोबर एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू झाले. यासाठी लोकसभा मोहिते यांनी लढवायची तर विधानसभेला जानकर यांनी उतरायचे इथपर्यंत ही चर्चा गेली. त्यामुळे जानकर यांच्यासाठीही ही जमेची बाजू ठरली. जानकर यांच्याकडूनही एकत्र येण्याचे संकेत मिळाले. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्तम जानकर हे भाजपच्याबरोबर राहतील असा अंदाज होता; पण, त्यांची नाराजी काही वेगळीच होती. त्यामुळे मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची भेट झाली; पण, त्यावेळीही भाजपला पाठिंब्याविषयी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असे स्पष्ट केलेले. मात्र, सोलापूर मतदारसंघातून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जानकर आणखी नाराज झाले. त्यामुळे माढ्यात भाजपला दगाफटका बसण्याची शक्यता वाढली. ही नाराजी दूर करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच खासदार रणजितसिंह, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि जानकर हे विशेष विमानाने नागपूरला गेले; पण, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे दिसत आहे.बुधवारी जानकर मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाणार असे संकेत होते. त्यातूनच बुधवारी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत माढा मतदारसंघात मोहिते-पाटील यांच्याबरोबर एकत्र येण्याविषयी पवार यांनी आवाहन केले. तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघ निवडणूकविषयीही जानकर यांना आश्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जानकर हे मोहिते यांच्याबरोबर राहण्याचे संकेत आहेत. पण, दि. १९ एप्रिलच्या मेळाव्यातच जानकर कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊन भूमिका मांडणार आहे. त्यामुळे त्यानंतरच त्यांची खरी भूमिका समोर येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील हेही बरोबर होते. जवळपास एक तास चर्चा झाली. यातून पवार यांनी विराेधक एकत्र होतात, तसेच तुम्हीही बरोबर राहिले पाहिजे. मतदारसंघातील मते किती एकत्र होतात ते पाहा, काही नियम पाळले पाहिजते, असे सांगितले. तसेच आमच्या आणि मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांत विधानसभेबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. आता १९ एप्रिलला कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असणार आहे.- उत्तम जानकर

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmhadaम्हाडा