शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

मदन भोसले गटाकडून विरोधकांची अनामत जप्त

By admin | Updated: May 7, 2015 00:21 IST

‘किसन वीर’वर हॅटट्रिक : मतमोजणी पूर्ण; सर्व जागांवर विजय

भुर्इंज : वाई तालुक्यातील भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदाच्या सर्वच्या सर्व जागा बहुमताने तिसऱ्यांदा जिंकत कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसलेंनी सहकाराला नवा आयाम देण्याच्या आपल्या प्रयत्नावर सभासदांकडून शिक्कामोर्तब करून घेतले़ कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी पूर्ण झाली. किसन वीर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ५) झाली़ या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते़ संचालक पदाच्या २१ जागांपैकी पाच जागा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच मदन भोसलेंनी बिनविरोध जिंकल्या होत्या़ उर्वरित १६ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते़ ज्येष्ठ संचालक नारायण पवार यांनी केलेल्या बंडखोरीशिवाय शिवसेनेने १५ उमेदवार रिंगणात उतरविले होते. तर उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँगे्रसने कारखान्यावर पाचशे कोटींचे कर्ज असल्याचा आरोप करत निवडणुकीतून माघार घेतली होती़ मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी दुपारी वळवाने हजेरी लावल्याने मतमोजणी प्रक्रिया सहा-सात तास लांबविण्यात आली़ पहिला निकाल रात्री उशिरा लागला. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून सी. व्ही. काळे (२७,०२२) रात्री साडेअकरा वाजता विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. ़विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : मदन भोसले (२६,६५६), गजानन बाबर (२५,३७१), मधुकर शिंदे े(२३,६९५), राहुल घाडगे (२६,७९३), प्रताप यादव (२६,३०५), प्रवीण जगताप (२६,५८६), रतन शिंदे (२६,००९), सयाजी पिसाळ (२६,२५२), चंद्रसेन शिंदे (२६,३८०), विजय चव्हाण (२६,८१०), नंदकुमार निकम (२६,६७५), सचिन साळुंखे (२६,५१०), अरविंद कोरडे (२७,०६५), आशा फाळके (२६,९६७), विजया साबळे (२५,९८८). अशा पद्धतीने शेवटचा निकाल यायला बुधवारची सकाळ झाली. निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या नेतृत्वाखालील मोजीणी झाली. (वार्ताहर) चोवीस हजारांहून अधिक मतांनी पराभूत...सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी व महाबळेश्वर तालुक्यांचे कार्यक्षेत्र व ४४ हजार सभासद या कारखान्यात आहेत़ सातारा ऊस उत्पादक गटासह सोसायटी व मागासवर्गीय अशा पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या़ भुर्इंज, वाई, जावळी, बावधन, कवठे, खंडाळा व कोरेगाव ऊस उत्पादक गट (प्रत्येकी तीन जागा ), महिला राखीव (दोन जागा), भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागास प्रवर्ग अशा सोळा जागांसाठी मतदान झाले होते. सुमारे सत्तर टक्के मतदारांनी (३० हजार ७११) मतदानाचा हक्क बजावला़ मदन भोसले यांनी मतदारांशी असणाऱ्या जनसंपर्काच्या जोरावर एकहाती निवडणुकीला सामोरे जात मतदान झालेल्या सर्वच्या सर्व जागा किमान चोवीस ते सत्तावीस हजार मतांच्या फरकाने जिंकल्या़ सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त केली़