शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सातारा अन् महाबळेश्वरात नीच्चांकी तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:24 IST

सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात सतत उतार होत असून सोमवारी सातारा येथे १२.०१ आणि महाबळेश्वरला ११.०५ अंशाची नोंद झाली. यावर्षातील दोन्ही शहरातील हे सर्वात नीच्चांकी तापमान ठरले. त्यातच शीत लहर असल्याने गारठ्यात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसातारा अन् महाबळेश्वरात नीच्चांकी तापमानगारठा वाढला : ११.५ अंशांपर्यंत पारा घसरला

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात सतत उतार होत असून सोमवारी सातारा येथे १२.०१ आणि महाबळेश्वरला ११.०५ अंशाची नोंद झाली. यावर्षातील दोन्ही शहरातील हे सर्वात नीच्चांकी तापमान ठरले. त्यातच शीत लहर असल्याने गारठ्यात वाढ झाली आहे.जिल्ह्यात मागील महिन्यापासून थंडीला सुरूवात झाली. मात्र, यावर्षी किमान तापमानात सतत चढ-उतार होत आला आहे. कधी किमान तापमान १५ अंशाच्या खाली येते. तर काहीवेळा २० अंशावरही पोहोचते. त्यातच ढगाळ वातावरणाचाही अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे सातारकरांना विविध हवामानाशी सामना करावा लागत आहे.मागील आठवड्यात साताऱ्याचे किमान तापमान २० अंशापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर हळू-हळू तापमानात उतार आला. आता तर साताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आलेले आहे.

२० डिसेंबर रोजी साताऱ्यात १४.०८ अंश तापमानाची नोंद झालेली. तर सोमवारी १२.०१ अंश तापमान नोंदले गेले. यावर्षातील साताऱ्यातील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर मागील महिन्यात ११ नोव्हेंबरला साताऱ्यांत १२.०६ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर प्रथमच तापमान यापेक्षाही खाली आले आहे.महाबळेश्वरमध्येही थंडीचा जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा आनंद पर्यटक लुटत आहेत. महाबळेश्वरमध्ये रविवारी १२.०१ अंश तापमान होते. तर सोमवारी ११.०५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे सलग दुसºया दिवशी महाबळेश्वरमधील किमान तापमान नीच्चांकी राहिले.दरम्यान, किमान तापमान वाढत चालल्याने थंडीने जोर धरला आहे. यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवरही परिणाम झाला आहे. दुपारपर्यंत वातावरणात थंडी राहते. तर सायंकाळपासून पुन्हा थंडीला सुरूवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना ऊबदार कपड्याशिवाय बाहेर पडता येत नाही.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर