शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

गुणाजी दिसेनात; आता बांदेकरांची प्रतीक्षा

By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST

महाबळेश्वर : सत्ता बदलताच ‘जाहिरातबाजी’साठी नव्या अभिनेत्याची चर्चा

अजित जाधव -महाबळेश्वर -महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये दरवर्षी १५ लाख पर्यटकांचा पाहुणचार करण्यात येतो. परंतु नगर पालिकेकडून व नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी २५ लाख पर्यटक आकडा गाठण्यासाठी आता अभिनेता आदेश बांदेकर यांना पाचरण केले आहे.पालिकेकडून महाराष्ट्र व गुजरात या भागातील पर्यटकांची रेलचेल असली तरी प्रचार आणि प्रचाराअभावी दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यात महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात नाही. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेने मराठी चित्रपट अभिनेता मिलिंद गुणाजी यांना महाबळेश्वरचे ब्रँड अबॅसिडर करण्यात आले आहे.यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचे तत्कालीन पर्यावरण सचिव येथे आयोजित केलेल्या बैठकीत नमूद केले होते व यासाठी त्यांनी पािलकेला वर्षभराच्या कार्यक्रमासाठी २० लाखांचा निधी मंजूर केला होता. पर्यावरण सचिवाच्या सूचनेप्रमाणे पालिकेने तात्काल पर्यावरणाबाबत जागृती करण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी पुणे येथील शास्वत इको सोल्युशन फाऊंडेशन या संस्थेशी करार केला. करारानुसार जनजागृती मोहीमेचा आज शुभारंभ नगराध्यक्ष उज्ज्वला तोष्णिवाल यांच्या हस्ते येथील सुभाष चौकात करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, नगरसेवक संतोष शिंदे, नगरसेविका फेनिदा वलगे, सुरेखा आखाडे, मुख्याधिकारी सचिन पवार, अरुण वायदंडे उपस्थित होते. यावेळी गिरिस्थान प्रशाला व कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केले.मिलिंद गुणाजी यांच्या महाबळेश्वर माहितीबाबतच्या सीडीज् बाजारपेठेत विकण्यास ठेवण्यात येणार आहेत. १० ते १५ सेकंदाची व्हिडिओ चित्रीकरण प्रत्येक न्यूज चॅनलला देण्यात येणार आहेत व यामुळे महाबळेश्वर शहरात मिलिंद गुणाजी बाबत कॉल फॉर आयडीयाज्च्यावतीने आदेश बांदेकरही जनजागृती मोहिमेमध्ये दिसून येणार आहेत. असे असणार कार्यक्रम१ वर्षभर राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबाबत शहरातील प्रत्येक विविध सेवाभावी संघटना, संस्था यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये शहरात प्लॅस्टिक व कचरा मुक्त करणे, संदेश देणारे सूचना फलक लावणे, विविध स्पर्धात्मक कार्यक्रम राबवणे, कचरा, डबे लावणे, रॅली काढून जनजागृती करणे, प्रिंट मिडियाचे सहकार्याने मोहीम सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. २पर्यटकांशी थेट संपर्क येत असणाऱ्या सर्व संघांना एकत्र बोलवून त्यांना सूचना करण्यात येणार आहेत. यामध्ये टॅक्सी चालक, घोडेवाले, व्यापारी, टपरीधारक, विविध सेवाभावी संघटना यांच्या बैठकी घेण्यात येणार आहेत. ३कचरा करू नये, यासाठी नागरिकांना व पर्यटकांना प्रवृत्त करण्यात येणार आहे.पर्यावरणाविषयी जनजागृतीमहाबळेश्वरमध्ये शाश्वत इको सोलूशन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती व शिक्षण याद्वारे पर्यावरण बाबीची शहरात जनजागृती मोहीम कॉल फॉर ग्रीन आयडीयाज या वर्षभरात राबविण्यात येणार आहेत. यामध्ये कॉल फॉर आयडीया या उपक्रमामध्ये अभिनेता मराठी आदेश बांदेकर यांचा सहभाग करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.