शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पुनवडीतील मंदिरात लंडनच्या घंटेचा नाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:50 IST

जावळी तालुक्यातील पुनवडीत भैरवनाथ मंदिरासमोर शंभर किलो वजनाची ऐतिहासिक घंटा आढळून आली. १८८१ मध्ये लंडनमधील जिलेट ब्लेंड कंपनीने ही घंटा तयार केली होती.

ठळक मुद्देपुनवडीतील मंदिरात लंडनच्या घंटेचा नाद, शंभर किलो वजन घंटेचा लंडन ते पुनवडी असा प्रवास

सातारा : जावळी तालुक्यातील पुनवडीत भैरवनाथ मंदिरासमोर शंभर किलो वजनाची ऐतिहासिक घंटा आढळून आली. १८८१ मध्ये लंडनमधील जिलेट ब्लेंड कंपनीने ही घंटा तयार केली होती.

या घंटेचा १४० वर्षांपूर्वी लंडन ते पुनवडी झालेला मनोरंजक प्रवास कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्रा. गौतम काटकर, संशोधक विद्यार्थी महेश गुरव, मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी उलगडला.पुनवडी गावाजवळील भैरवनाथाच्या मंदिरासमोर एका झाडावर भली मोठी घंटा टांगली आहे. घंटेचा परीघ सुमारे ८० इंच आहे. ही घंटा पंचधातूंपासून तयार केली आहे. या घंटेकडे कोणाचे लक्ष नव्हते. प्रा. काटकर, महेश गुरव आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी पुनवडी येथे जाऊन घंटेची पाहणी केली. त्यावेळी ही घंटा ऐतिहासिक असल्याचे निदर्शनास आले.या घंटेवर जिलेट ब्लेंड अँड कंपनी क्रायडॉन असे उठावदार इंग्रजी अक्षरात कोरले आहे. त्याचबरोबर घंटा तयार केल्याचे १८८१ असे लिहिण्यात आले आहे. तर एका बाजूला मारुती लक्ष्मण पारटे अशी अक्षरे ठिपक्यांमध्ये कोरण्यात आली आहेत.या घंटेचा अभ्यास केला असता मनोरंजक माहिती समोर आली. १४० वर्षांपूर्वी या घंटेचा लंडन ते पुनवडी असा झालेला प्रवास उलगडला गेला. ही घंटा लंडन शहराजवळील क्रायडॉन या शहरात तयार केली. ही कंपनी चर्च आणि अन्य इमारतीवर असणाऱ्या मनोऱ्यातील घड्याळे आणि चर्चमध्ये वापरण्यात येणाऱ्या घंटेसाठी प्रसिद्ध होती.

या कंपनीने जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वीस टनांहून अधिक वजनाच्या स्मारक घंटा बनवून दिल्या आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी यासह अन्य युरोपीयन राष्ट्रांत अनेक मोठ्या चर्च आणि स्मारकस्थळी या कंपनीच्या घंटा बसविण्यात आल्या आहेत.याचवेळी गावातील भैरवनाथाच्या मंदिरासाठी घंटा आणण्याचा गावकऱ्यांचा विचार सुरू होता. मारुती पारटे यांनी जहाजावरून विकण्यास आलेली ही भलीमोठी घंटा मंदिरासाठी विकत घेतली. शंभर किलो वजनाची ही घंटा बैलगाड्यावर टाकून गावात आणण्यात आली. त्यानंतर ती भैरवनाथाच्या मंदिरात बसविण्यात आली. ही घंटा पाहण्यासाठी इतिहासप्रेमी भेट देत आहेत.जहाजातून वाहतूकही घंटा प्रामुख्याने चर्चसाठीच बनविण्यात आली होती. ती लंडनहून जहाजाने भारतात मुंबईत आली. यावेळी पुनवडी गावातील अनेक लोक मुंबईत कापड गिरण्या आणि बंदरावरील गोदीत कामास होते. ही घंटा विकण्यासाठी आल्यावर मुंबईत आलेल्या मारुती लक्ष्मण पारटे यांच्या निदर्शनास आली. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेSatara areaसातारा परिसर