शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नगराध्यक्षपदाचा आज लोणंदला होणार फैसला : राष्टवादीचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:17 IST

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या आज होणाऱ्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा वळाल्या आहेत. संपूर्ण गावात गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उलट-सुलट ...

ठळक मुद्देकाँग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरूभाजपालाही जवळ करण्याचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा नागरिकांंमध्ये

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या आज होणाऱ्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा वळाल्या आहेत. संपूर्ण गावात गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांना आज दि. २६ रोजी दुपारी बारा वाजता पूर्णविराम मिळणार आहे. तसेच नगराध्यक्षपद घोषित केल्यानंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

लोणंदच्या नगराध्यक्षपदाची धुरा आपल्याच पक्षाकडे राहावी, यासाठी आमदार मकरंद पाटील व अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभर लोणंदचा भावी नगराध्यक्ष कोण? यावर चौकाचौकात चर्चा रंगविल्या जात होत्या. लोणंद नगरपंचायतीची सूत्रे आपल्याच हातात राहावीत. यासाठी मकरंद पाटील यांनी भाजपाला सोबत घेतले असून, त्यांना उपनगराध्यक्ष पद देण्याचे कबूल केले आहे. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले सचिन शेळके यांना नगराध्यक्ष पदाची संधी देऊन त्यांना राष्टÑवादीत सामावून घेतले आहे. तर काँग्रेसचाही एक नगरसेवक राष्टÑवादीच्या बाजूने येणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटीलच लोणंद नगरपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणार असल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.

मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी फार मोठी उलथापालथ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अ‍ॅड. बाळासाहेब बागवान व आनंदराव शेळके-पाटील आपल्या गावाच्या चाव्या आमदारांच्या हातात सहजासहजी देणार नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्याकडे सत्ता यावी, यासाठी राष्टवादी पक्षाचे काही नाराज नगरसेवक व भाजपालाही जवळ करण्याचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा नागरिकांंमध्ये चालू आहे. पैशाचा दुरुपयोग करून लोणंदचे राजकारण गढूळ करणाºया व अनुभव नसलेले नगरसेवक फोडणाºयांच्या हातात कोणत्याही परिस्थितीत सत्ता जाऊ देणार नाही, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुुरू आहे.

नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याचे उत्तर मिळण्यासाठी नागरिकांना आजच्या दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.दि. २६ रोजी सकाळी दहा ते बारापर्यंत उपनगराध्य पदासाठी नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.संपूर्ण लोणंदकरांचे लक्षपंचायत समिती निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील यांनी जातीय राजकारण केले, असा आरोप धनगर समाजातील काही नेत्यांनी आमदारांवर केला होता. त्याची परतफेड करण्यासाठी यावेळी आमदारांनी सचिन शेळके यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली आहे. सचिन शेळके यांनी मागील अडीच वर्षांत आनंदराव शेळके-पाटील यांनाच मदत केली होती. मात्र, यावेळी सचिन शेळके यांना आनंदराव शेळके-पाटील मदत करणार का? याकडे संपूर्ण लोणंदकरांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान, उद्या निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नगरपंचायतीच्या आवारात भला मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती एपीआय गिरीश दिघावकर यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक