शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

फलटणच्या तलाठी कार्यालयाला कुलूप : शाळा प्रवेशाला अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:57 IST

फलटणचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास सदानकदा कुलूप लावलेले असते. त्यामुळे गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे

ठळक मुद्देविविध दाखल्यांसाठी हेलपाटे मारून शेतकरी वैतागले

फलटण : फलटणचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास सदानकदा कुलूप लावलेले असते. त्यामुळे गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

मुलाच्या शैक्षणिक कामासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची व पीक कर्जासाठी सातबारा व खातेउताऱ्यांची आवश्यकता असते. त्यासाठी अनेक शेतकरी तलाठी कार्यालयात दररोज येत आहेत. परंतु यापूर्वीचे तलाठी ८ मेपासून रजेवर गेले आहेत.फलटण तलाठी कार्यालयाची पर्यायी जबाबदारी ठाकुरकी व फरांदवाडी गावच्या तलाठी यांच्याकडे देण्यात आली. परंतु गेली वीस दिवस बुरुड गल्ली येथे असणाºया फलटण तलाठी कार्यालयात तलाठी सतत गैरहजर राहत होत्या. सोमवार, दि. २७ रोजी अनेक नागरिक कामानिमित्त तलाठी कार्यालयात आले असता त्यांना तलाठी नसल्याने कार्यालयास कुलूप लावलेले दिसले.

काही नागरिक मोती चौक येथील रिव्हेन्यू कार्यालयात ठाकुरकी व फरांदवाडी गावच्या तलाठी कार्यालयात फलटण तलाठी यांचा शोध घेण्यासाठी गेले असता या ठिकाणीही तलाठी नसल्याने नागरिक हैराण झाले होते. फलटण येथील तलाठी कार्यालय बंद असल्याने सातबारा, खाते उतारा, विविध दाखले, विविध नोंदीच्या कामासाठी हेलपाटे मारून वयोवृद्ध शेतकरी कंटाळून गेले आहेत.

संबंधित तलाठी यांच्या अनुपस्थितीमुळे पीक कर्ज विविध दाखले यापासून वंचित राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सध्या सुरू असलेली दुष्काळ परिस्थितीमुळे तलाठी यांनी त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी राहण्याची व तलाठी कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता असताना तलाठी हजर राहत नसल्याने ग्रामस्तरावरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे.फलटण तालुक्यातील तलाठी कार्यालयात हजर नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून, नागरिक व शेतकरी यांच्या तक्रारीकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न आहे. 

फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालयांत वेळेवर उपस्थित नसतात. यासंदर्भात मी वारंवार तहसीलदार तसेच प्रांताधिकाºयांना निवेदन दिलेले आहेत. परंतु, प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.- प्रदीप झणझणे,शिवसेना फलटण तालुकाप्रमुख 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना